प्रभाग विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा आदर्श घ्यावा : सुवेंद्र गांधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

प्रभाग विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा आदर्श घ्यावा : सुवेंद्र गांधी

 प्रभाग विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा आदर्श घ्यावा : सुवेंद्र गांधी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरच्या महानगरपालिका पोट निवडणुकीत तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला भाजपने एकाकी लढा देवून पुन्हा एकदा धूळ चारली आहे. प्रभाग 9 मधून भाजपाचे बालपणीचा मित्र व अर्बन बँकेचे सभासद असलेले प्रदीप परदेशी निवडून आल्याचा आनंद झाला आहे. प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडववून प्रभागाच्या विकासासाठी प्रदीप परदेशी कटिबद्ध राहील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा आदर्श घेवून प्रभागाचा विकास करावा, असे प्रतिपादन सुवेंद्र गांधी यांनी केले.
महानगरपालिका प्रभाग 9 च्या पोटनिवडणुकीतील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप परदेशी यांचा नगर अर्बन बँक परिवाराच्या वतीने बँकेत सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी यांनी सत्कार करून अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विकासाचा महामार्ग पुस्तक गांधी यांनी परदेशी यांना दिले. यावेळी संचालक ईश्वर बोरा, गिरिष लाहोटी, संतोष गांधी, हितेश बलदोटा, राजू बोगा, गोरख लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप परदेशी यांनी सर्वांनी केलेल्या बहुमोल सहकार्यानेचे हा विजय मिळवता आला असे सांगून सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment