घरकुलाच्या वाढीव अनुदानासाठी ठराव पाठविणार : प्रताप शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

घरकुलाच्या वाढीव अनुदानासाठी ठराव पाठविणार : प्रताप शेळके

 घरकुलाच्या वाढीव अनुदानासाठी ठराव पाठविणार : प्रताप शेळके


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारच्या घरकुल योजनेसाठी लागणारा निधी अनुदान हे अतिशय कमी प्रमाणात आहे. दिवसेंदिवस मालाच्या किमती वाढत आहेत. अनुदानाची रक्कमही वाढवण्यात यावी याबाबत केंद्र सरकारकडे जिल्हा परिषदेच्या वतीने ठरवणार ठराव पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी सांगितले.
 नगर तालुका पंचायत समितीच्या आवारात घरकुल कसे असावे यासंदर्भातील डेमोच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शाशिकांत गाडे, जिल्हा परीषद सदस्य  संदेश कार्ले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार,  रामदास भोर, प्रविण कोकाटे, रविंद्र भापकर, गुलाब शिंदे, व्ही, डि. काळे, रविंद्र कडूस, बेबी पानसरे,  मंगल आव्हाड, संदिप गुंड, गटविकास अधिकारी रेश्मा हो जगे, माच्छिंद्र झावरे, विश्वास जाधव, प्रकाश कुलट उपस्थित होते.
यावेळी गाडे म्हणाले घरकुला पासून कोणी वंचित राहणार नाही यासाठी केंद्र सरकार  घरकुल योजना राबवत आहे. शहरी व ग्रामीण भागात घरकुलासाठी देण्यात येणारा निधी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत दूर झाली तर शहरा प्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुलासाठी निधी मिळाला पाहीजे. यावेळी पवार म्हणाले नगर तालुका पंचायत समितीच्या आवारात केंद्र सरकार राबवत असलेल्या घरकुल योजनेचा डेमो उभारला आहे. मात्र घरकुलच्या रकमेमध्ये बांधकाम करताना रक्कम कमी पडत आहे . या रक्कम वाढीसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ठराव घेऊन जिल्हा परीषदला पाठवणार व शासनाला पाठवणार. गटविकास अधिकारी होजगे म्हणाल्या, घरकुलासाठी दिड लाख रुपये अनुदान दिले जाते. याद्यानुसार  पात्र लाभार्थना घरकुले दिले आहे. ऑनलाईन पध्दतीने घरकुलाची रक्कम खात्यावर जमा केली जाते. स्वतःची रक्कम घालून लाभार्थी पाहिजे तसे बांधकाम करू शकतात. पंचायत समितीच्या आवारात बांधलेले घरकुल हे भविष्यात बचत गटाच्या महिलांनी उत्पदन विक्री साठी देणार आहोत.

No comments:

Post a Comment