महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये अर्ज करणार्‍या रुग्णांना हॉस्पीटलमधून पैसे मिळण्यास सुरुवात- भुतारे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 14, 2021

महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये अर्ज करणार्‍या रुग्णांना हॉस्पीटलमधून पैसे मिळण्यास सुरुवात- भुतारे.

 महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये अर्ज करणार्‍या रुग्णांना हॉस्पीटलमधून पैसे मिळण्यास सुरुवात-  भुतारे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरूना उपचारादरम्यान 400 रुग्णांनी केलेल्या अर्जावर शासनाने व सदर कंपनीने अंतिम निर्णय घेऊन रुग्णांना पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत त्याच माध्यमातून या हॉस्पिटल मार्फत रुग्णांना पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे या खाजगी हॉस्पिटल ला जवळपास सहा कोटी रुपयांचा दनका बसलेला आहे सदर रक्कम परत मिळविण्याकरिता मनसेने वारंवार पाठपुरावा पुरवठा केल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला त्यांच्या मागणीला यश आलेले दिसून येत आहे तरी ज्या रुग्णांनी नागरिकांनी कोरोना आजारावर उपचार घेतले होते व सदर अर्ज महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये सादर केले होते. अशा रुग्णांनी वरील हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून आपल्या बिलाची रक्कम परत घेण्याकरिता त्याठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा असे आवाहन मनसेचे नितीन भुतारे यांनी केले आहे.
जर हॉस्पिटलने उडवाउडवीची उत्तरेदिली, पैसै देण्यास टाळाटाळ केली बिलांची कमी रक्कम देण्याचा काही प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कार्यकर्त्याकडे ,पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्याकडे  नागरिकांनी संपर्क साधावा. मोबाईल नंबर 7304612121 या क्रमांकावर संपर्क साधावा. वरील हॉस्पीटल मध्ये अर्ज केलेल्या नागरिकांनी संपर्क साधून आपल्या बीलांची रक्कम परत मिळवावी. असेआवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. मनसेच्या नितीन भुतारे यांनी केलेल्या प्रयत्ना मुळे गोरगरीब जनतेला जवळपास 400नागरिकांना 6 कोटी रूपये परत मिळणार असल्यामुळें सर्वसामान्य, गोरगरीब जनता नितीन भुतारे यांना आशीर्वाद देत आहेत. तसेच त्यांच्या कामाची चर्चा देखिल होत आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजने च्या राज्य हमी आयोगाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनामार्फत अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील साईदीप हॉस्पिटल ताराकपूर ,नोबेल हॉस्पिटल प्रेमदान चौक, अनभुले हॉस्पिटल प्रेमदान चौक, आनंदऋषीजी हॉस्पिटल कोटी रोड सक्कर चौक हॉस्पिटल, स्वास्थ्य हॉस्पिटल लाल टाकी, विखे पाटील हॉस्पीटल विळदघाट या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले जवळपास चारशे रुग्णांनी परत मिळावे याकरिता मनसेच्या नितीन भुतारे यांच्या आवाहनानंतर सदर योजनेमध्ये अर्ज सादर केले होते. त्याला आज यश येताना दिसत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन अहमदनगर जिल्ह्यात, शहरात कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना न्याय देण्याचे काम नितीन भुतारे यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील शहरातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणार्‍या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे मोफत उपचार होत नव्हते त्यामुळे सदर हॉस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रूग्णांचे जवळपास चारशे अर्ज मनसेच्या नितीन भुतारे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजने द्वारे या कंपनीकडे पाठवून सदर रुग्णांची उपचार हे महात्मा फुले योजने अंतर्गत करून त्या मध्ये रूग्णांची बीले समाविष्ट करून संबंधित रुग्णांना बिलाची रक्कम मिळविण्याच्या मनसेच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

No comments:

Post a Comment