निवडणूक स्थगितीचा छिंदमचा अर्ज फेटाळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 14, 2021

निवडणूक स्थगितीचा छिंदमचा अर्ज फेटाळला.

 निवडणूक स्थगितीचा छिंदमचा अर्ज फेटाळला.

मनपा प्रभाग क्र 9 पोटनिवडणूक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर मनपाचा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदमने अहमदनगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल करून नगरसेवक पद रद्दचा निर्णय स्थगित करावा, तसेच निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या निवडणुकीला स्थगितीसाठी छिंदमने केलेला अर्ज वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी फेटाळला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द ठरविण्याचा निर्णय दिला होता. त्याने महापालिकेच्या प्रभाग 9 क मधून निवडणूक लढविली होती. त्याच्या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
श्रीपाद छिंदम भाजपमध्ये असताना त्याला उपमहापौर पद मिळाले होते. या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्र भर संतप्त प्रतिक्रिया उपटल्या होत्या. शिवसेने महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा बोलावली. या सभेत उपमहापौरपद व नगरसेवक पदावरून बडतर्फ करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीपाद छिंदमने प्रभाग क्रमांक 9-क मधून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीतील मतदानाच्या दिवशीच छिंदमच्या भावाने मतदान यंत्राची पूजा केली होती. त्यावरून श्रीपाद छिंदम पुन्हा टीकेचा विषय ठरला होता.
राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल ढगे तर महापालिकेतर्फे अ‍ॅड. महेश काळे यांनी बाजू मांडली. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर न्यायालयास हस्तक्षेप करता येत नाही. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून छिंदमच्या दोन्ही मागण्या फेटाळल्या.

No comments:

Post a Comment