कलेचा व्यक्तीमत्वावर मोठा परिणाम होतो - प्राचार्य नुरिल भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

कलेचा व्यक्तीमत्वावर मोठा परिणाम होतो - प्राचार्य नुरिल भोसले

 कलेचा व्यक्तीमत्वावर मोठा परिणाम होतो - प्राचार्य नुरिल भोसले

सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयाची प्रगतकला महाविद्यालयाला भेट

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  आदर्श शिक्षक बनण्यासाठी शिक्षका मध्ये कलात्मक गुण असणे खूप महत्वाचे असून, कलेमुळे जीवन समृद्ध होते. मग ती कला छंद, आवड, कुठलीही असो त्या कलेचा व्यक्तीमत्वावर मोठा परिणाम होत असतो. विद्यार्थ्यांसमोर आदर्श शिक्षकाची प्रतिमा तयार होते. याच आदर्श शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो, असे प्रतिपादन प्रगत कला महाविद्यालयाचे प्राचार्य नुरिल भोसले यांनी केले.
सेंटर मोनिका डि.एड. कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी तारकपूर येथील प्रगतकला महाविद्यालयास भेट दिली. याप्रसंगी प्रगतचे प्राचार्य नुरिल भोसले, सेंट मोनिकाच्या प्राचार्या सुनिता भिंगारदिवे, प्रा.महावीर सोनटक्के आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयाचे प्राचार्या सुनिता भिंगारदिवे म्हणाल्या, व्यक्तीमत्व विकास घडवितांना कलेचे व कलात्मक जीवनाचे अनन्य साधारण महत्व आहे. कलेचा प्रवास समृद्धीकडे जातो. कला मानवास समाधानी बनवते, असे सांगून उपस्थितांना डि.एड्. महाविद्यालयाची माहिती दिली. यावेळी प्रगत कला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निसर्गचित्रण, व्यक्तीचित्रण, रचनाचित्र, शिल्पकला, कागदकाम, म्युरल या विविध कला विषयांमध्ये जलरंग, तैलरंग, अ‍ॅक्रेलिक, स्टीपलिंग, शाडूमाती, पीओपी इ. माध्यमांची शास्त्रशुद्ध माहिती महावीर सोनटक्के यांनी दिली. यावेळी शिंदे सर, घाटविसावे, सौ.ओहोळ मॅडम, सौ.सोनवणे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment