नाताळ सणाला नगर शहरात उत्साहात सुरुवात अहमदनगर पहिली मंडळी चर्चची आकर्षक सजावट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

नाताळ सणाला नगर शहरात उत्साहात सुरुवात अहमदनगर पहिली मंडळी चर्चची आकर्षक सजावट

 नाताळ सणाला नगर शहरात उत्साहात सुरुवात अहमदनगर पहिली मंडळी चर्चची आकर्षक सजावट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरामध्ये नाताळ सणानिमित्त उत्साहाचे वातावरण पसरले असून चर्च सजावटीचे काम जोरदार सुरू आहे. अहमदनगर पहिली मंडळी चर्चमध्ये युवकांनी पुढे येऊन गेल्या वीस दिवसांपासून अथक परिश्रम घेऊन चर्चची आकर्षक सजावट केली आहे. नाताळ सणानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचे आयोजन केले असून ख्रिस्ती बांधव एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात नाताळ सण साजरा करणार आहे.या कामासाठी पास्टरेट कमिटीचे सहकार्य लाभले असल्याची माहिती अहमदनगर पहिली मंडळी चर्चेचे खजिनदार शामवेल खरात यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment