तडीपार सराईत गुन्हेगार गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 11, 2021

तडीपार सराईत गुन्हेगार गजाआड.

 तडीपार सराईत गुन्हेगार गजाआड.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हद्दपार आदेशाचा भंग करून शहरात वास्तव्य करणार्‍या रिवाज ऊर्फ तात्या मुस्ताफ सय्यद वय 35, रा. जुनाबाजार, बारातोटी कारंजा जवळ यास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई कोतवाली पोलिस करीत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन सदरचे तडीपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत मा. श्री. बी. जी. शेखर पाटील साहेब, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी व मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, अहमदनगर यांनी पोनि/ अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आदेश दिले होते. त्या आदेशा प्रमाणे शाखेचे सफौ/मन्सुर सय्यद, पोहेकॉ संदीप घोडके, संदीप पवार, पोना/शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, पोकों/योगेश सातपुते यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांना हद्दपार इसमांना चेक करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे अहमदनगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि/अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, हद्दपार इसम रिवाज ऊर्फ तात्या मुस्ताफ सय्यद वय 35, रा. जुनाबाजार, बारातोटी कारंजा जवळ, अहमदनगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. नमुद हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता मा. उपविभागीय दंडाधिकारी, नगर विभाग यांचेकडील आदेश हद्दपार प्रस्ताव क्रं. 03/2020, दिनांक 21/01/2021 पासून एक वर्षाचे कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. नमुद हद्दपार इसम हा हद्दपार आदेशाचा भंग करून बेकायदेशिररित्या अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द कोतवाली पो.स्टे. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील कार्यवाही कोतवाली पो.स्टे. करीत आहेत.
ही कारवाई बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली सौरभ कुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर व सुदर्शन मुंडे, उपविभागीय पोलीस अधीकारी, शेवगांव विभाग व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment