दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत : आयुक्त गोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत : आयुक्त गोरे

 दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत : आयुक्त गोरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दि. 23 जानेवारी 2022 रोजी होणार्‍या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत शासनाच्या वतीने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पल्स पोलिओ लसीकरण  करण्यासाठी मनपा आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत.नवी पिढी सुरक्षित,सुदृढ आणि सशक्त व्हावी यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.यासाठी सूक्ष्म तयारी करावी. असे आवाहन मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.
अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाची, राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम कार्यक्रमा अंतर्गत पोलिओ टास्क फोर्स ची बैठक आयुक्त यांच्या दालनात संपन्न झाली. या प्रसंगी त्यांनी कोरोना नियमावली या संदर्भात ही माहिती दिली.
याच बरोबर त्यांनी कोरोना नियमावली संदर्भातही सूचना दिल्या. आरोग्य अधिकारी डॉ. श्री.सतीश राजूरकर यांनी लसीकरण मोहिमीची माहिती देताना सांगितले की, 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेमध्ये बायव्हायलंट  लसीचा वापर करण्यात येणार आहे.5 वर्षाखालील 45473 बालकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट असलेल्या ही  मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी पोलिओ रविवार बूथ व त्यांनतर 5 दिवस घरभेटीचे तसेच ट्रान्झिट, मोबाईल व नाईट टीमचे आयोजन करण्यात येत आहे.दिनांक 24 ते 28 जानेवारी वंचित बालकांसाठी घरोघरी लसीकरण तसेच झोपडपट्टी,बांधकामे, विटभट्टया,पेरीअर्बन एरिया, याठिकाणी लसीकरण होणार आहे.100 ते 120 लाभार्थ्यांमागे 1 बूथ,प्रत्येक बुथवर दोन कर्मचारी,5 बुथमागे एक 1 पर्यवेक्षक, असे नियोजन असून महानगरपालिका हद्दीतील 7 व कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल सह एकूण 8 नागरी आरोग्य केंद्रा अंतर्गत 359 बूथ, पीपीआय 718 कर्मचारी, आयपीपीआय 151 कर्मचारी,ट्रान्झिट 28,मोबाईल (फिरते पथक) 08 असे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत .या साठी मनपा स्तरीय 5 अधिकारी,8 आरोग्य अधिकारी,44 सुपरवायझर असे पर्यवेक्षक असणार आहेत अशी माहिती डॉ. श्री.सतीश राजूरकर यांनी दिली. आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर, प्र.प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान, आरोग्य विभागातील सर्व  वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.गिरीश दळवी,डॉ.श्री.गणेश मोहोळकर, डॉ.शिल्प चेलवा, डॉ.आयशा शेख,डॉ.आरती डापसे, डॉ.माने,डॉ पवार ( कॅन्टोन्मेंट),डॉ.सय्यद आशना, बालरोग तज्ञ डॉ.बागल निमा संघटना,गुणे आयुर्वेद महाविद्यालय,बूथ हॉस्पिटल,स्नेहालय, आनंदऋषीजी हॉस्पिटल,सुरभी हॉस्पिटल,काकासाहेब म्हस्के महाविद्यालय,रोटरी क्लब,प्रतिनिधी तसेच सिस्टर सौ.कविता खिलारी,शिल्पा ठोंबरे, अमोल पागिरे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment