आघाडीच्या नेत्यांनी, ‘ती’ व्हिडीओ क्लिप बारकाईने पहावी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

आघाडीच्या नेत्यांनी, ‘ती’ व्हिडीओ क्लिप बारकाईने पहावी...

 शिवाजीराव कर्डिलेंवर आरोप करण्याऐवजी... आघाडीच्या नेत्यांनी, ‘ती’ व्हिडीओ क्लिप बारकाईने पहावी...

‘त्या’ प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न - भाजपाचा आरोप.
मोकाटेंवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत वाढ...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोणी काय केले, कसे व्यभिचार केल, काय कुटाने केले, हे जेऊर गटातील लोकांना आणि नगर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांना समजले आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आणि फिर्यादी कोण हे पोलीस रेकॉर्ड वर आहे. त्यांचा आणि माजी आमदार कर्डीले यांचा कोठेही संबंध नाही. हे सर्व खोटं बनावट आहे असे महाआघाडी म्हणते तर मग मोकाटे यांना फरार होण्याची गरज का पडली आहे. जिल्हयातच नव्हे तर राज्यात नाचक्की झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे. आ. शिवाजीराव कर्डीले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी आघाडीच्या नेत्यांनी मोकाटेची व्हिडीओ क्लिप बारकाईने पहावी, विश्वास नसेल तर त्यांचे सरकार आहे. सरकारी यंत्रणेकडून तपासून घ्यावी. यापुढे बिनबुडाचे आरोप करणार्‍यांना जशास तशे उत्तर दिले जाईल असा इशारा बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांसह भाजपा पदाधिकार्‍यांनी दिला आहे.
पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी महिलेवरील अत्याचार प्रकारणामुळे नगर तालुका महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यांची अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहे. तोंड दाखवायला जागा राहिली नाही. महाआघाडी मधील या लोकांनी नगर तालुक्याची प्रतिमा घातली. झालेल्या घाणेरड्या प्रकरणाने जेऊर गटाची बदनामी झाली .नगर तालुक्याचीही बदनामी झाली. घटना घडल्यानंतर आज महाआघाडीला माजी मंत्री कर्डीले यांच्यावर आरोप करण्याची आठवण झाली कारण गेल्या 10 ते 15 दिवसात महाआघाडीचे लोक तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांना लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या समजल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना यांनाच तोंड लपविण्याची वेळ आली आहे. म्हणून त्यांच्यावरील लोकांचा राग. संताप कमी होण्यासाठी कर्डीले यांच्यावर खोटे आरोप केला जात आहेत. आरोप करताना त्यांनी काही पुरावें का दिले नाहीत ? चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. खोटं बोला पण रेटून बोला हीच नीती महाआघाडी च्या लोकांनी कायम केली आहे.
महाआघाडीने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांना अजून डोक्यावर घेऊन नाचा आमची हरकत नाही. घोड्यावर, हत्तीवर मिरवणूक काढा, पेढे वाटा आम्हाला त्याचे घेणे देने नाही. तुमची संस्कृती काय आहे. पांढर्‍या कपड्यांच्या मागे तुम्ही काय केले हे आता उघड झाले आहे. पण माजी मंत्री कर्डीले यांच्यावर विनाकारण खोटे आरोप करू नयेत. नगर तालुक्यातील जनतेला सत्य काय ते माहिती आहे. त्यांनी ते पहिले आहे. यांना गटात आणि गावातच नव्हे तर स्वतः च्या नातेवाईकात आणि कुटुंबासमोर तोंड दाखवायला जागा राहिली नाही.  म्हणून तालुक्यातील जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी असे खोटे आरोप सुरू आहेत. पण जनता सर्व काही ओळखून आहे. पांगरमल दारु कांडामध्ये बनावट दारुमुळे 11 लोकांचा मृत्यू झाला. त्या निवडणूकीमध्ये सदरची पार्टी कोणी आयोजित केली होती. बनावट दारु कोणी पुरविली होती, याची आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा नव्या सरकारच्या यंत्रणेकडून चौकशी करुन घ्यावी. आघाडीच्या नेत्यांनी दुष्कर्मावर पांघरुन घाल्याऐवजी तालुक्यातील विकासकामांकडे लक्ष दयावे. आमच्या नेत्यावर खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. येत्या काळात महाआघाडीचे सर्व काळे कारनामे जनतेसमोर पुराव्यानिशी मांडण्यात येणार असल्याचे भाजपा पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सभापती अभिलाष धिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, सुरेशराव सुंबे, दिलीप भालसिंग, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब खर्से,बहिरु कोतकर, बबनराव आव्हाड, श्रीकांत जगदाळे, संभाजी पवार, दिपक कार्ले, शिवाजी कार्ले, राम पानमळकर, बाजीराव हजारे, राजेंद्र शेळके, विलास शिंदे, संजय गारूडकर, राहुल पानसरे, उध्दव कांबळे, संतोष कुलट, राजू दरकुंडे आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये एका पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी गोविंद मोकाटे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलांही मागासवर्गीय समाजाची होती तिने जातीचे प्रमाणपत्र तोफखाना पोलीस ठाण्यात तिने सादर केल्यानंतर आरोपी गोविंद मोकाटे विरुद्ध काल ट्रॉसिटी क्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे मोकाटेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

No comments:

Post a Comment