जामखेड तालुक्यातून पावणे तीन लाखाचा हिरा गुटखा जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

जामखेड तालुक्यातून पावणे तीन लाखाचा हिरा गुटखा जप्त.

 जामखेड तालुक्यातून पावणे तीन लाखाचा हिरा गुटखा जप्त.

दोन आरोपी गजाआड; तिसरा फरार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात गुटखा, पान मसाला विक्रीस बंदी असताना ठिकठिकाणी पान टपरीवर, किराणा दुकानात गुटखा विक्री ठेवला जात आहे. जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धोत्री गावामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये हिरा गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व कर्जत उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे व सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद यांना याबाबत माहिती देताच या पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. दोन लाख 76 हजार रु. किंमतीचा हिरा गुटखा जप्त करून 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास  बेरड, पोलीस नाईक लक्ष्मण खोकले, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते ,चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर, पोलीस कॉन्स्टेबल रुदय गौतम घोडके, यांनी या संयुक्त कारवाई मध्ये भाग घेतला. जामखेड पोलीस स्टेशन  येथुन सरकारी  वाहनाने निघुन बातमीतील नमुद ठिकाणी धोत्री गावाच्या शिवारात रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले रा . धोत्री याचा घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये पायी चालत जावुन खात्री केली असता तेथे एकुण तीन इसम हे हिरा नावाचा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात साठवून ठेवल्याचे मिळून आले. अचानक छापा टाकला असता रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले वय 26 वर्षे रा . धोत्री ता . जामखेड जिल्हा अहमदनगर सचिन निवृत्ती गायकवाड वय 31 वर्षे रा . जामखेड हे मिळुन आले असुन यांना ताब्यात घेतले. तर संजय सुभाष जगताप रा . वाणेवाडी ता . पाटोदा जिल्हा बिड हा पळून गेला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहे.

No comments:

Post a Comment