अपक्ष उमेदवार अजय साळवेंचा सुरेश तिवारींना पाठिंबा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 15, 2021

अपक्ष उमेदवार अजय साळवेंचा सुरेश तिवारींना पाठिंबा.

 अपक्ष उमेदवार अजय साळवेंचा सुरेश तिवारींना पाठिंबा.

मनपा प्रभाग क्र 9 पोटनिवडणूक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिका प्रभाग 9 (क) च्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक अजय साळवे यांनी महाविकास आघाडीचे नेते आमदार अरूणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश  तिवारी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलताना साळवे यांनी सांगितले की, माझा उमेदवारी अर्ज बाहेरगावी असल्याकारणाने राहिला होता. प्रसिध्दीपत्रकाव्दारे महाविकास आघाडीस पाठिंबा व्यक्त करीत आहे. यावेळी झालेल्या चर्चे प्रसंगी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, महेश भोसले आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments:

Post a Comment