चेक बाउन्स, न्यायालयाची शिक्षा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 15, 2021

चेक बाउन्स, न्यायालयाची शिक्षा.

 1 वर्ष सक्षम कारावास. 3 लाख रुपये दंड.

चेक बाउन्स, न्यायालयाची शिक्षा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः हात उसनवार घेतलेल्या रकमेच्या परतफेडीपोटी फिर्यादी शेख इरफान रशिद यास दिलेला धनादेश वटला नाही, म्हणून दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. यू. पी. देववर्षी साहेब यांनी देवून आरोपी विष्णू हिरा सारस, रा. भिंगार यांस 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला 3 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. आरोपीने नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास 6 महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. भिंगार येथील फिर्यादी शेख इरफान रशिद याने सन 2012 मध्ये त्याचा मित्र आरोपी विष्णू हिरा सारस, रा. भिंगार यांस 2 लाख रुपये आरोपीची व्हॅन दुरुस्तीकरिता हात उसनवार दिले होते. फिर्यादीने आरोपीकडे सदर रक्कमेची मागणी केली असता, सदर रक्कमेचे परत फेडी पोटी आरोपीने फिर्यादीला दिलेला धनादेश वटला नाही. म्हणून फिर्यादीने आरोपीला वकिलामार्फत नोटीस पाठवून धनादेशाच्या रकमेची मागणी केली. परंतु आरोपीने मुदतीत धनादेशाची रक्कम दिली नाही. म्हणून फिर्यादी याने अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात आरोपीविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टचे कलम 138प्रमाणे खटला दाखल केला होता. आरोपीने दिलेला धनादेश हा भिशीचे व्यवहाराचे सिक्युरिटी पोटी दिलेला होता. सदर धनादेशाचा फिर्यादी गैरवापर करीत आहे. आरोपी फिर्यादीची कोणतीही रक्कम देणे लागत नाही, असा बचाव आरोपीने घेतला होता. परंतु न्यायालयाने आरोपी बचाव अमान्य करून सदर खटल्याचा निकाल दि. 10/12/2021 रोजी देवून व आरोपीला दोषी धरून 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व 3 लाख रुपये नुकसान भरपाई आरोपीने फिर्यादीला द्यावी. आरोपीने नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादीला न दिल्यास आरोपीला 6 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. शेख हाफिज एन.जहागीरदार (नोटरी पब्लिक) व अ‍ॅड. दावर एफ. शेख यांनी काम पाहिले.
या खटल्यात फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. शेख हाफिज एन. जहागीरदार (नोटरी पब्लिक) व अ‍ॅड. दावर एफ. शेख (अहमदनगर) यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here