14 कोटी रुपयांची बेलवंडी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर- सरपंच सौ. सुप्रिया पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 15, 2021

14 कोटी रुपयांची बेलवंडी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर- सरपंच सौ. सुप्रिया पवार

 14 कोटी रुपयांची बेलवंडी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर- सरपंच सौ. सुप्रिया पवार

जलजीवन मिशन योजने अंतर्गत; नगर जिल्ह्यातील 7 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी.

नगर जिल्ह्यातील बेलवंडी बु. पा. पु. योजना, वाढीव मिरजगाव पा. पु. योजना ता. कर्जत, वारी कान्हेगाव पा. पु योजना ता. कर्जत, माळेगाव थडी पा. पु. योजना ता. कोपरगाव निमगाव भोजापूर व 3 गावे पा. पु योजना ता.संगमनेर जवळेकडलग व 1 गावे पा. पु. योजना ता. संगमनेर गुंजाळवाडी व 1 गावे पा. पु. योजना, ता.संगमनेर या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरविण्याच्या हेतूने सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच गावासाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कामाला सुरुवात करणार्‍या बेलवंडी गावच्या उच्च शिक्षित सरपंच प्रा.डॉ.सौ.सुप्रिया संग्राम पवार यांचे प्रयत्नांना अखेर यश आल.े आणि गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. बेलवंडी हे मोठया लोकसंख्येचे,बाजारपेठेचे व विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारे तालुक्यातील एक मोठे गाव परंतु गावाला निश्चित असा कुठलाही पाण्याचा स्त्रोत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गावच्या नागरिकांना नेहमीच अडचण. पाण्यासाठी आंदोलन,उपोषण हे गावचे दरवर्षी चे काम. धरण भागात पाण्याचा तुटवडा झाला की गावाला टंचाई निर्माण होऊन टॅन्कर शिवाय पर्याय च नाही हे नेहमीचे सूत्र. असताना आता पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने बेलवंडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राज्यातील दरडोई निकषांपेक्षा जास्त असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत 14 कोटी रुपयांची बेलवंडी पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याची माहिती बेलवंडी गावच्या उच्च शिक्षित प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रा.डॉ.सौ.सुप्रिया संग्राम पवार यांनी दिली. बेलवंडी गावचा कायमचा पाणी प्रश्न सुटला असून दुसरा योगायोग म्हणजे असा की सन 1978 साली माझे सासरे अहमदनगर जिल्हा परिषदचे तत्कालीन सदस्य व पंचायत समिती श्रीगोंदा चे उपसभापती कै.जगन्नाथ धोंडीबा पवार यांनी गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती व त्यांनतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे सौभाग्य मला लाभले. असेही त्या म्हणाल्या.
पाण्याच्या त्रासापासून गावाला मुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच सरपंच सौ पवार यांनी या प्रश्नासाठी प्रयत्न सुरू केले.
गावातील नागरिकांची साथ व श्री भैरवनाथ महाराज यांचे आशीर्वाद यामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगून सौ पवार म्हणाल्या की खर तर नळ पाणी पुरवठा योजना मंजुरीचा प्रवास अतिशय खडतर होता.दिनांक 4/12/2017 रोजी गावच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आणि दुसर्‍याच दिवसापासून गावाला स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन काम करण्यास सुरुवात केली. सुरुवात अशी की, विसापूर की घोड धरण हा पहिला प्रश्न. सुरुवातीस विसापूर धरणापासून सर्व्हे करण्यात आला परंतु विसापूर तलावात बारा महिने पाणी उपलब्ध नसते तसेच सदर तलावातून ज्या गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर आहे तेथे देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही असे निदर्शनास आले.नंतर पर्याय होता फक्त घोड (चिंचणी) तलावाचा. मग काय चिंचणी चा सर्व्हे सुरु झाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांचे कडून चिंचणी तलावापासून बेलवंडी पर्यंतचा सर्व्हे करण्यात आला आणि गावासाठी पाणी पुरवठा मंजुरीचा प्रवास सुरु झाला. अहमदनगर-नाशिक -औरंगाबाद-ठाणे -मुबई असा प्रवास सुरु झाला.कुठलाही राजकीय वारसा नसताना पहिल्याच प्रयत्नांत फाईल मुबई मंत्रालय येथे मंजुरी साठी गेली.पाणी पुरवठा योजना मंजुरीचा जी आर (शासन निर्णय )निघणार तोच 2019 ची विधानसभा आचारसहिंता लागू झाली आणि फाईल जैसे थे राहिली. दरम्यानच्या काळात शासनाचे धोरण बदलले आणि जल जीवन मिशन अंतर्गत  नवीन नियमावली नुसार पाणी पुरवठा योजना मंजुरीचा पुन्हा प्रवास सुरु झाला.ध्येय एकच की महिलांचे डोक्यावरील हंडा खाली उतरविणे आणि गावचा कायमचा पाणी प्रश्न सोडवणे त्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचे नाही हे मनात ठरवून घेतले त्यासाठी किती परिश्रम किती अडचणी आल्या कशा पद्धतीने काम केले व करून घेतले हे शब्दांत सांगणे अशक्य आहे. असेही सरपंच सौ सुप्रिया संग्राम पवार म्हणाल्या.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषीकेश यशोद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here