शिवसेना-भाजप-मनसे असा तिरंगी सामना. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

शिवसेना-भाजप-मनसे असा तिरंगी सामना.

 शिवसेना-भाजप-मनसे असा तिरंगी सामना.

मनपा क्र.9 मध्ये सहा जण निवडणूक रिंगणात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपाच्या प्रभाग क्र. 9 मधील पोट निवडणुकीत आघाडी धर्म पाळून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली असून आता शिवसेना-भाजपा-मनसे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजपाचे प्रदीप परदेशी, शिवसेनेचे सुरेश तिवारी, मनसेचे पोपट पाथरे यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. अजय साळवे, ऋषिकेश गुंडला, संदीप वाघमारे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
काल अर्ज माघारीच्या दिवशी 13 पैकी सात जणांनी माघार घेतल्याने सहा जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. प्रभाग क्र. 9 च्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसचे अमित चव्हाण, राष्ट्रवादीचे शदाब शेख यांच्यासह शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेले गौरव ढोणे, भाजपचे अभिजीत चीप्पा, अपक्ष कैलास शिंदे, वंदना शेकटकर, अनुराधा साळवे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे भाजप, शिवसेना व मनसेमध्ये ही लढत होणार आहे.

No comments:

Post a Comment