पाथर्डीतील चितळे वस्तीवर दरोडा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

पाथर्डीतील चितळे वस्तीवर दरोडा.

 पाथर्डीतील चितळे वस्तीवर दरोडा.

तीन वृद्धांना जबर मारहाण; सोन्या चांदी सह रोख रक्कम लुटली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाथर्डीतील चितळे वस्तीवर दरोडा टाकताना आमानुषतेचा कळस करत दरोडेखोरांनी तीन वयोवृद्ध नागरिकांना जबर मारहाण करीत दरोडा टाकला. लिंबाजी नाथ चितळे (वय 65 वर्ष), बाबुराव गुणाजी उळगे (वय 65 वर्ष) आणि कमलबाई लिंबाजी चितळे (वय 58 वर्ष) असं मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावं आहेत. दरोडेखोरांनी त्यांना कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत लिंबाजी नाथ चितळे हे गंभीर जखमी झाले असून अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून हात फ्रॅक्चर झाले आहेत.
काल मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणार्‍या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी आधी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे, बाबुराव गुणाजी उळगे, लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी आणि बाबुराव यांना जबर मारहाण करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 20 हजार रुपयांची रोख रक्कमही लांबविली आहे. लक्ष्मीबाई उळगे (वय 60 वर्ष) यांच्याकडील गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून घेतले. त्यांना मात्र दरोडेखोरांनी मारहाण केली नाही. या प्रकरणी पाथर्डी पोलीस घटनास्थळी भेट दिली. असून पुढील तपास सुरु केला आहे.

No comments:

Post a Comment