रिझर्व बँक सुरक्षा नियमांचे पालन करा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

रिझर्व बँक सुरक्षा नियमांचे पालन करा !

 रिझर्व बँक सुरक्षा नियमांचे पालन करा !

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे बँक प्रतिनिधींना आवाहन..
एटीएम मधील रकमा चोरीच्या गुन्ह्यात वाढ..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून, स्पोट घडवून ,मशीन चोरून, त्यातील रोख रक्कम लुटण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत.  भारतीय रिझर्व बॅकेने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे या घटना घडत असल्याचा निष्कर्ष पोलीस प्रशासनाने काढला असून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींची बैठक घेऊन मार्गदर्शन करुन भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रकानुसार एमटीएम चे सुरक्षेबाबत उपाययोजना करणे बंधनकारक असल्याची जाणीव बॅक प्रतिनिधींना करुन दिली.  अहमदनगर जिल्ह्यातील एटीएम मधील रोख रकमेच्या चोरीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून एटीएम मशीन गँस कटींग करुन, स्फोट घडवुन तसेच एटीएम मशीन वाहनाच्या सहायाने ओढुन नेवून त्यामधील रोख रक्कम चोरुन नेणे अशा प्रकारच्या घटना जिल्ह्यामध्ये नजिकचे काळामध्ये घडलेल्या आहेत. त्यामध्ये बर्‍याचशा बँका ह्या एटीएम सुरक्षेबाबत भारतीय रिझर्व बँकेच्या ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य रितीने पालन करीत नसल्याने एटीएम चोरीच्या घटना घडल्याचे दिसून आलेले आहे.एटीएम मधील रोख रक्कम चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे दृष्ठीकोनातुन उपाययोजना करणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने दिनांक 22/12/2021 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे जिल्ह्यातील एटीएम असलेल्या बँकाचे, विशेषतः असुरक्षित एटीएम असलेल्या बँकाचे सुरक्षेच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेवू शकतील अशा जबाबदार प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
एटीएम सेंटरचे बाहेर सुरक्षा रक्षक नेमणे. एटीएम सेंटरमध्ये इंटरनेट कनेक्शन असावे व त्याव्दारे एटीएम सेंटरवर काही छेडछाड झाल्यास त्याची माहिती बँकेच्या हेडक्वॉर्टरला तात्काळ उपलब्ध होण्याची व्यवस्था असावी. 3) एटीएमला काही छेडछाड झाल्याचे बँकेच्या मुख्यालयास समजताच त्याची माहिती त्वरीत स्थानिक पोलीस ठाण्यास देण्याची व्यवस्था असावी. पर्याप्त प्रमाणात सी.सी.टी.व्ही बसवावेत व त्याची ऊतठ एटीएम मशीनमध्ये न ठेवता तो इंटरनेटव्दारे बँकेच्या मुख्यालयात असावा व तेथे सीसीटीव्ही फुटेज स्टोअर करावे. एटीएम सेंटरमध्ये काही छेडछाड झाल्यास तेथील अलार्म हा तात्काळ वाजेल अशी व्यवस्था करावी. 6) बर्‍याच ठिकाणी असे निदर्शनास येते कि, एटीएम मशिन हे टपरी, बूथ किंवा असुरक्षित इमारतीत बसविले जाते. तरी एटीएम मशिन हे कायमस्वरुपी मजबूत इमारतीमध्ये बसवावे. दजर आपणास सुरक्षा रक्षक नेमणे अथवा वरील सुचनांची पुर्तता करणे शक्य होत नसेल किंवा त्यास वेळ लागत असेल तोपर्यंत असुरक्षित व एकांतात असलेल्या एटीएम मशिनमध्ये रात्रीचे वेळी रोख रक्कम ठेवू नये. अशा सुचना बॅक प्रतिनिधींना देण्यात आल्या.
सर्व प्रतिनिधींना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे. सदर मिटींगसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था यांचे साधारणतः 100 प्रतिनिधी हजर होते.

No comments:

Post a Comment