सर्वसामान्यांसाठी अर्बन बँक व जिल्हा वाचनालयाचे काम : संजय जोशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

सर्वसामान्यांसाठी अर्बन बँक व जिल्हा वाचनालयाचे काम : संजय जोशी

 सर्वसामान्यांसाठी अर्बन बँक व जिल्हा वाचनालयाचे काम : संजय जोशी

हिंद सेवा मंडळात रंगला तीन ऐतिहासिक जुन्या संस्थांचा सत्कार समारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हिंद सेवा मंडळ, नगर जिल्हा वाचनालय व नगर अर्बन बँक या शंभरी पार केलेल्या जिल्ह्यातील महत्वाच्या संस्था आहेत. सत्कार समारंभा निमित्त आज तिन्ही ऐतिहासिक संस्था एकत्र आल्याने हा सत्कार समारंभही ऐतिहासिक ठरत आहे. अर्बन बँकेच्या निवडणुकीत सुरवातीपासून सक्रीय सहभाग घेत स्व.दिलीप गांधी यांचे पॅनल निवडून आणण्यासाठी श्रीरामपूर विभागाची जवाबदारी सांभाळली होती. अर्बन बँक व जिल्हा वाचनालय या सर्वसामान्यांसाठी काम करणर्‍या संस्थांच्या नूतन पादाधीकारींचे अभिनंदन, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या वतीने नगर अर्बन बँक व नगर जिल्हा वाचनालयाच्या नूतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमा निमित्त तीन ऐतिहासिक जुन्या संस्था एकत्र आल्याने हा सत्कार समारंभ रंगला. यावेळी अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी, संचालक अनिल कोठारी, महेंद्र गंधे, ईश्वर बोरा, संपत बोरा, जिल्हा वाचनालयाचे संचालक चंद्रकांत पालवे, डॉ.राजा ठाकूर, ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, अजित रेखी, किरण अग्रवाल, संजय चोपडा, गणेश अष्टेकर, राहुल तांबोळी, तन्वीर खान, अनंत देसाई आदींचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
प्रा.शिरीष मोडक म्हणाले, नगर जिल्ह्यात कायर्रत असलेल्या हिंद सेवा मंडळाचे  जिल्हा वाचनालय व अर्बन बँक या संस्थांशी जिव्हाळ्याचे नाते आहे. मंडळाच्या सभासदांची या दोन्ही संस्थांवर निवड होणे याचा सार्थ अभिमान हिंद सेवा मंडळाला आहे. राज्यातील पहिले वाचनालय असलेल्या नगर जिल्हा वाचनालयाची लवकरच सावेडी भागात अद्यावत इमारत उभी राहणार आहे. अर्बन बँक लवकर संकटातून बाहेर येण्यासाठी नवे पदाधिकारी उत्तम काम करतील.
अजित बोरा म्हणाले, हिंद सेवा मंडळ कायमच विविध क्षेत्रातील पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करून अभिनंदन करत आहे. हिंद सेवा मंडळाचे सभासद विविध क्षेत्रात काम करत आपला कामाचा ठसा उमटवत आहेत. प्रस्ताविकात डॉ.पारस कोठारी म्हणाले, काही वर्षांपूर्वी मी अर्बन बँकेचा संचालक व नंतर झालेलो व्हाईस चेअरमन या पदांमुळेच मला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, असे सांगितले. यावेळी यावेळी संस्थेचे सीताराम सारडा महाविद्यालयाचे चेअरमन प्रा.मकरंद खेर, भाईसथ्था नाईट स्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, रणजीत श्रीगोड, बी.यू.कुलकर्णी, विठ्ठल ढगे, भनगडे, कैलास बालटे, अभिजित लुणिया आदी उपस्थित होते. सर्व सत्कारार्थीनी मनोगत व्यक्त करत हिंद सेवा मंडळाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment