सहकार पॅनलने सभासदांचा विश्वास संपादन केला- बाबासाहेब मुदगल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

सहकार पॅनलने सभासदांचा विश्वास संपादन केला- बाबासाहेब मुदगल

 सहकार पॅनलने सभासदांचा विश्वास संपादन केला- बाबासाहेब मुदगल

मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या सहकार पॅनेलच्या निवडणुकीची सिद्धार्थ नगर येथे प्रचारफेरीने सांगता


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक सुरू असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे सिद्धार्थनगर येथे सहकार पॅनेल च्या वतीने वीर लहुजी वस्ताद साळवे व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व प्रचार फेरीला सुरु करून सभासदांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी बाबासाहेब मुदगल म्हणाले की,गेल्या तीन वर्षांमध्ये सभासदांच्या हिताचे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सभासदांचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील अशी खात्री मला वाटते असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment