शेत वस्तीवर दरोडे घालणारी टोळी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 15, 2021

शेत वस्तीवर दरोडे घालणारी टोळी गजाआड.

 शेत वस्तीवर दरोडे घालणारी टोळी गजाआड.

नेवासा, राहुरी व पाथर्डी तालुक्यात दरोडे घातल्याची 3 आरोपींची कबुली.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 15 दिवसापूर्वी राहुरी नेवासा पाथर्डी तालुक्यातील शेतातील वस्तीवर दरोडा घालून दहशत माजविणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेस यश आले असून या टोळीतील तीनही आरोपींनी पाच गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे तीनही आरोपी रवींद्र मुबारक भोसले, लखन प्रल्हाद चव्हाण, कुलत्या बंडू भोसले सर्वजण राहणार ता. गंगापूर जि.औरंगाबाद येथील रहिवाशी आहेत.
सदर घटनेची हकिगत अशी कि, दि 5 डिसे. 2021 रोजी फिर्यादी श्री. बबन जगन्नाथ बेल्हेकर वय 65, रा. कांगोणी, ता. नेवासा हे त्यांचे कुटूबिंयासह घरामध्ये झोपलेले असतांना गुन्हेगारांनी त्याचे घराचे मागिल बाजुचे सेफ्टी डोअर व लाकडी दरवाजा तोडुन, घरामध्ये प्रवेश करुन, फिर्यादी व त्यांचे आईस चॉपर व चाकुचा धाक दाखवुन गळ्यातील मंगळसुत्र तसेच कपाटातील रोख रक्कम असा एकुण 3,36,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता. या घटने बाबत फिर्यादी यांनी शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर तसेच यापुर्वीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असल्याने मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन गुन्ह्याचे तपास कामी स्वतंत्र पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या.
पोनि/ अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, हा गुन्हा आरोपी रविंद्र भोसले रा. गंगापुर जिल्हा औरंगाबाद याने व त्यांचे साथीदारांनी मिळुन केल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि  गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, संदीप पवार, दत्ता गव्हाणे, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, पोकॉ रविंद्र घुगांसे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमुल व पोहेकॉ बबन बेरड अशांनी मिळून गंगापुर येथे जावुन आरोपीचा शोध घेवून आरोपी रविंद्र मुबारक भोसले यास गंगापुर येथुन ताब्यात घेतले त्याचेकडे नमुद गुन्ह्या बाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन कसुन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार लखन चव्हाण, कुलथ्या भोसले व इतर साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीच्या आधारे आरोपींताचा शोध घेवुन आरोपी नंबर ऊर्फ लखन प्रल्हाद चव्हाण कुलत्या बंडु भोसले यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींताकडे वरील नमुद गुन्हया व्यतीरिक्त आणखीन कोणते कोणते गुन्हे केले आहेत. या बाबत कसुन चौकशी केली असता त्यांनी मागिल 15 दिवसांचे कालावधीमध्ये राहुरी, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील शेतातील वस्त्यावर जावुन मारहाण करुन लुटमार केली असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेवून शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन करीता आहे. ही कारवाई  मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलीस अधीकारी, शेवगांव विभाग, शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment