किराणा दुकान, बेकरीत, आता मिळणार वाईन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 15, 2021

किराणा दुकान, बेकरीत, आता मिळणार वाईन!

 किराणा दुकान, बेकरीत, आता मिळणार वाईन!


मुंबई -
राज्यात आता किराणा दुकान, बेकरीमध्ये जर वाईन विकण्यासाठी ठेवली असल्याचे दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण आता राज्य सरकार वाईनची विक्री किराणा दुकानामध्ये करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेणार आहे. राज्य सरकारकडून काल वाईनवरील नॉमिनल एक्साईज ड्युटी (अबकारी कर) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईनवर 10 रुपयांचा कर आकारण्यात आला आहे. राज्यातील किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईन विकण्याच्या परवानगीविषयी लवकरच राज्य सरकार नोटीस जारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच 1 लीटरमागे 10 रुपये अबकारी कर आकारण्यात येणार असल्यामुळे वाईन खरेदी करणार्‍यांचे खिसे देखील गरम होणार आहेत. किराणा दुकान आणि बेकरीमध्ये वाईनची विक्री केल्यावर राज्यात किती खपत होते. याबाबतची माहिती मिळणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरतही 5 कोटी रुपयांचा निधी कर वाढवल्यामळे जमा होणार असल्यामुळे वाईन बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्यात 2000 पासून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही कर वाढवण्यात आला नव्हता. परंतु आता 10 टक्के अबकारी कर वाढवण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारला 5 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच उत्पादन शुल्क विभागाला महाराष्ट्रात वाईनच्या किती बॉटल्स विकल्या जातात याबाबत माहिती मिळेल असे मुख्य उत्पादन शुल्क विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सध्या 70 लाख लिटर वाईनची वर्षाला खपत होते, वर्षाला 1 कोटी लीटर खपत होण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बारमध्ये वाईन सीलबंद असलेल्या बॉटलमधूनच विकता येणार आहे. दोन बारमधील अंतर 200 मीटर असावं हा नियम लागू होणा नाही. बीअरसारखेच बारमध्ये वाईन कॅनमध्ये देण्यात येऊ शकतात. अलिकेडच राज्यात आयात करण्यात आलेल्या व्हिस्कीवर 300 टक्के लीटरवरुन 150 टक्के कर कमी करण्यात आला आहे. तसेच लवकरच वाईनबाबत राज्य सरकार आदेश जारी करण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment