वेषांतर, नामांतर करून राहणारा आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

वेषांतर, नामांतर करून राहणारा आरोपी गजाआड.

 वेषांतर, नामांतर करून राहणारा आरोपी गजाआड.

नाशिक, कोतवाली, एमआयडीसी पोलिस ठाण्यांना वॉन्टेड.
नाशिक सराफी दुकानावर दरोडा टाकून पोलिसावर हल्ला करून झाला होता पसार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी, चोरी, विनयभंग असे गुन्हे दाखल असणारा आडगाव, नाशिक, कोतवाली, एमआयडीसी पोलिस ठाण्यांना वॉन्टेड असणारा नाशिक येथील सराफ दुकानावर दरोडा टाकून फरार झालेला आरोपी सुनील सिंग जीतसिंग जुनी वय-26 रा.संजय नगर काटवन खंडोबा हा विषयांतर आणि नामांतर करून तो अहमदनगर शहरातील संजय नगर झोपडपट्टीत दडून बसला होता. एलसीबी पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा मागमूस शोधत ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके,उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, विजय खंडागळे, बापू फोलाने, भिमराज खर्से, देवेंद्र शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि. 12 सप्टेंबर 2018 रोजी रात्री पोनि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना एक सफेद रंगाची तवेरा कार नं. थ् एमएच / 14/डीए/6037 मधुन 8 ते 9 इसम मनमाड नगर रोडने अहमदनगर शहराचे दिशेने कोठेतरी दरोडा घालण्यासाठी येत आहेत. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक निंबळक बायपास चौक, नगर मनमाड रोड येथे जावुन वाहने चेक करीत असतांना दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी बातमीतील नमुद क्रमाकांची तवेरा कार ही मनमाड बाजुकडुन अहमदनगर दिशेने येत असल्याची दिसल्याने, सदर तवेरा गाडी चालकास गाडी थांबविण्याचा इशारा केला. त्यावेळी या ठिकाणी असलेल्या गतीरोधका जवळ कार चालकाने त्याचे कारचा वेग कमी केला असता पाठीमागे बसलेले 3 ते 4 इसम गाडीखाली उतरुन अंधाराचा फायदा घेवून पळुन गेले. एमआयडीसी पोलीस स्टेशन ला यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फरार आरोपीने सन 2019 मध्ये आर. के. ज्वेलर्स, आडगांव, जिल्हा नाशिक या दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीसांचे वाहनाचा व सायरनचा आवाज ऐकुण पळून जात असताना पाठलाग करणार्‍या पोलीस पथकास कोयत्याचा धाक दाखवुन व गावठी कट्टयातुन गोळीबार करुन पळून जाताना पोलीसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये पायास गोळी लागुन जखमी झालेला होता. तेव्हा पासुन हा आरोपी हा आडगांव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामिण यांना वॉन्टेड होता.
बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फरार आरोपींना अटक करुन कारवाई करणेसाठी स्वतंत्र पथक नेमण्याबाबत मनोज पाटील, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी आदेश दिले होते. त्या आदेशा प्रमाणे पोनि/अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी फरार आरोपींचे अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे स्वंतत्र पथक नेमुन फरार आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार अहमदनगर शहरामध्ये फरार आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/ अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा कडुन खबर मिळाली की, नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी सुनिलसिंग जितसिंग जुनी हा काटवण खंडोबा, अहमदनगर येथे स्वतःचे नाव बदलुन व वेशांतर करून राहत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई / सोपान गोरे, सफी/राजेंद्र वाघ, सफौ/विजय खंडागळे, पोहेकॉ/ बापु फोलाने, पोना/भिमराज खसे, पोना / देवेंद्र शेलार अशांनी मिळुन संजय नगर, काटवण खंडोबा येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती घेवुन आरोपी नामे सुनिलसिंग जितसिंग जुनी, वय 26, रा. संजय नगर, काटवण खंडोबा, अहमदनगर यास ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments:

Post a Comment