चैतन्य मंगल कार्यालय व कॅन्टोन्मेंट लॉनची भाडेवाढ त्वरित मागे घ्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

चैतन्य मंगल कार्यालय व कॅन्टोन्मेंट लॉनची भाडेवाढ त्वरित मागे घ्या.

 चैतन्य मंगल कार्यालय व कॅन्टोन्मेंट लॉनची भाडेवाढ त्वरित मागे घ्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिंगार शहराची अहमदनगर छावणी परिषदेकडे मागणी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भिंगार शहरात 90% नागरिक हे मजूर कष्टकरी व हातावर पोट भरणारे आहेत. चैतन्य मंगलकार्यालयात गोर-गरीब कष्टकरी जनतेचे शुभ कार्य होत असतात सदरील कार्यालय सरकारी असल्याने व पूर्वी त्याचे भाडे माफक दरात असल्याने येथील कष्टकरी जनतेस ते परवडणारे होते पण नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर छावणी परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कॅन्टोन्मेंट लॉन व चैतन्य मंगल कार्यालय यांच्या भाड्यामधे दुप्पट वाढ करण्यात आली असून ही भाडे वाढ भिंगार शहरातील सर्वसामान्य व कष्टकरी मजूर जनतेस परवडणारी नाही,आधीच महागाईने देशभरातील जनतेला पिचलेले असताना छावणी परिषदेने केलेली ही भाडेवाढ भिंगार शहरातील जनतेस वेठीस धरणारी आहे. भाडेवाढ येत्या 7 दिवसाच्या आत मागे घेतली गेली नाही तर कार्यसम्राट आ. संग्राम भैय्या जगताप  यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यालयावर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भिंगार शाखेने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
भाडे वाढ करत असताना छावणी परिषद सदरील ठिकाणी काय सुविधा देत आहे याचा विचार त्यांनी केलेला आहे का..?एकदा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी समक्ष येऊन या दोन्ही ठिकाणाची पाहणी करावी लॉनची भाडेवाढ त्वरित मागे घ्या
आणि पहावं की किती दुरावस्थेत ही शुभ कार्यालय आहेत अन मगच निर्णय घ्यावा.त्यामुळे सदरील निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून सदरील भाडेवाढ ही तात्काळ मागे घ्या अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते सर, सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मा.सुरेश भाऊ बनसोडे,आर.पी.आय(आ) चे माजी.नगरसेवक अजयराव साळवे, पी.आर.पी(कवाडे)चे प्रा.जयंतराव गायकवाड, भिंगार शहर अध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी काँगेस उपाध्यक्ष विशाल अण्णा बेलपवार, सामाजिक न्याय चे भिंगार शहर अध्यक्ष सिद्धार्थ आढाव सर, युवकचे शहर अध्यक्ष संजय खताडे, उपाध्यक्ष सृजन भिंगारदिवे, पत्रकार महेश भोसले, लहू कराळे, विजय चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

No comments:

Post a Comment