जखमी घुबड वन खात्याकडे सुपूर्द. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

जखमी घुबड वन खात्याकडे सुपूर्द.

 जखमी घुबड वन खात्याकडे सुपूर्द.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गव्हाणी जातीचे जखमी घुबड आज सकाळी तोफखाना परिसरात जखमी अवस्थेत पोलीस कर्मचार्‍यास आढळून आल्यानंतर पक्षीमित्र व वृत्त छायाचित्रकार मंदार साबळे यांनी त्यास वनविभागाकडे सुपूर्द करून जीवन दान दिले.
नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात आज सकाळी एक घुबड जखमी अवस्थेत पोलीस कर्मचारी यांना दिसून आले. त्यानंतर ही माहिती ड्युटीवर उपस्थिती असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना पो.कॉ. दत्तात्रय शिरसाठ, पो. कॉ. महादेव पवार, प्रीतम कांबळे यांनी सांगितली.
यानंतर कर्मचार्‍यांनी पक्षीमित्र आणि वृत्त छायाचित्रकार मंदार साबळे यांना कळवतातच ते तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यात येत त्यांनी जखमी घुबडाची पाहणी केली. त्यानंतर जखमी घुबडाला वनविभागाकडे प्राथमिक उपचारासाठी साबळे यांनी सुपूर्त केले. पक्षीमित्र, निसर्गमित्र आणि अभ्यासक असलेले मंदार साबळे यांनी सांगितले की, सदर जखमी घुबड हे, गव्हाणी घुबड असून नगर परिसरात सर्वत्र आढळते. घुबड निशाचर पक्षी असल्याने सायंकाळ नंतर शिकारीसाठी बाहेर पडतो. उंदीर खात असल्याने घुबड हा शेतकर्‍यांचा मित्र आहे. मात्र समाजात त्या बद्दल अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत.ननायलॉन मांजा मुळे ही मागील वर्षी जवळपास 30 घुबड जखमी अवस्थेत सापडले असल्याची माहिती साबळे यांनी यावेळी दिली.पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पो.कॉ दता़ञय शिरसाठ,पो.कॉ.महादेव पवार, प्रितम काबऴे आदींनी याकामी लक्ष देत जखमी घुबडाला जीवदान दिले.

No comments:

Post a Comment