विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने कापड बाजारात वीर जवानांना श्रद्धांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 10, 2021

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने कापड बाजारात वीर जवानांना श्रद्धांजली

 विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने कापड बाजारात वीर जवानांना श्रद्धांजली


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
2014 नंतर जनरल बिपिन रावत यांच्या कामात व बोलण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता त्यांचे अपघाती मृत्यू भारताच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. खूप मोठे हानी झाली आहे. रावत या देशासाठी हुतात्मा झाले  भारतीय सैन्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये कारवाई करताना दिसतात, अशा पद्धतीचा माणूस परत निर्माण होणं नाही, असे प्रतिपादन बजरंग दलाचे क्षेत्र सहसंयोजक विवेक कुलकर्णी यांनी केले.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत व तेरा वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे क्षेत्र सहसंयोजक विवेक कुलकर्णी, कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, सुखदेव दुर्गे, राजेंद्र गर्गे, जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गंधे, शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर, बजरंग दल शहर संयोजक कुणाल भंडारी, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, विशाल रायमोरकर, मनोहर भाकरे, ईश्वर बोरा, प्रतिक बोरा, रवि खितानी, धीरज सारसर, धीरज पोखरणा भारत थोरात, राज गांधी, साहिल पवार राजेंद्र चुंबळकर, हरीभाऊ डोळसे, अनिल देवराव आदी मान्यवर उपस्थित होते.
विवेक कुलकर्णी पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि बोलताना एका आवेग होता पोलीस या देशाचे संरक्षण करतात त्यांच्या प्रती असणारा नागरिकांचे प्रेम आहे आपणही त्या सगळ्या कुटुंबीयांच्या आणि या प्रशासनाच्या ही दुःखामध्ये आपण सहभागी आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गंधे यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here