धनंजय जाधव सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 10, 2021

धनंजय जाधव सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष

 धनंजय जाधव सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माजी नगरसेवक, साईद्वारका सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, अहमदनगर यंग मेन्स ज्युडो संघटनाचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व उच्च विद्याविभूषित अ‍ॅड धनंजय जाधव यांची सावित्री उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती जिज्ञासा अकादमीचे व विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, निमंत्रक प्रा. संगीताताई गाडेकर व श्रीकांत वंगारी यांनी दिली. विचारधारा गेल्या चार वर्षापासून नव्या वर्षातील पहिला सण म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा सावित्री उत्सव म्हणून साजरा करीत आहे. सावित्री उत्सव हा देशाचा महोत्सव व्हावा असा प्रयत्न देशभरातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून ज्या अहमदनगर शहरात सावित्रीबाई फुले शिकल्या त्या अहमदनगर शहरात सावित्री उत्सव मोठ्या प्रमाणत करण्याचा मानस असल्याने माजी नगरसेवक अ‍ॅड धनंजय जाधव यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जाधव घराणे हे अहमदनगर शहरात राजकीय, सामाजिक घराणे म्हणून प्रसिद्ध आहे आजोबा दत्तात्रय लक्ष्मण जाधव हे उपनगराध्यक्ष होते ते दत्तू खलिपा म्हणून प्रसिद्ध होते. आजी नानीबाई या सुद्धा नगरसेविका होत्यात आणि वडील कृष्णाभाऊ जाधव यांनी सुद्धा दीर्घकाळ पालिकेच्या अनेक राजकीय पदावर कार्य केले आहे. यांच्या नंतर धनंजय जाधव हे राजकीय वारसा सक्षमपणे चालवत आहेत. आज त्यांच्या पत्नी सुप्रिया जाधव या नगसेविका आहेत. धनंजय जाधव हे साईद्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने ते हेल्प मी इंडिया ही आरोग्य चळवळ चालवीत आहेत. या द्वारे ते अनेक रुग्णांना विविध मदत पुरवतात व मार्गदर्शन करतात. करोना काळात त्यांनी रस्तावर उतरून लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. धैर्याने जे कार्य केले, लोकांना मदतीसह दिलासा दिला त्याची दाखल अनेक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला. युवकांमध्ये प्रसिद्ध असलेले अ‍ॅड धनंजय जाधव हे हसतमुख प्रसन्न युवा नेता आहेत. त्यांच्या या कार्याचा आलेख पाहून विचारधाराने 3 जानेवारी 2022 रोजी होणार्‍या सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दि 3 जानेवारी ते दि 30 जानेवारी (म.गांधी स्मृतिदिन) पर्यंतजाहीर अभिवादन सोहळा, सावित्री- फातिमा पुरस्कार, चित्रप्रदर्शन, मशाल मिरवणूक, व्याख्याने, अंक, पुस्तक प्रकाशने असे विविध उपक्रम करण्यात येणार आहेत. अशी माहिती प्रियंका सोनावणे व कल्पना बुलबुले यांनी दिली.
स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातून व सर्व स्तरातून अ‍ॅड धनंजय जाधव यांचे त्यायाचे स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here