कुविख्यात गुन्हेगार सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

कुविख्यात गुन्हेगार सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

 कुविख्यात गुन्हेगार सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  कोणताही व्यवसाय न करता बेकायदेशीररित्या स्वतःचा आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून चोरी, दरोडा यासारख्या गुन्ह्यात सहभाग असणारा राहुरी, एमआयडिसी, शिर्डी, कोतवाली, भिंगार, शिक्रापूर, सुपा अशा विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असणारा कुख्यात गुन्हेगार सागर भांड  व त्यांचे साथीदार रवी पोपट लोंढे, निलेश संजय शिंदे, गणेश रोहिदास माळी, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी, रमेश संजय शिंदे या टोळी सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, डॉ. दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी गुन्हा दाखल केला होता, हा गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांडसह टोळीतील अन्य 5 सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीतपणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक, दपटशही  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. 
या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ेडिवायएसपी संदीप मिटके, पी आय राजेंद्र इंगळे, -पी आय राजपूत, तुषार धाकराव, सूर्यवंशी, विकास साळवे यांनी सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली आहे.

No comments:

Post a Comment