निघाले खगोलप्रेमी धूमकेतू पाहायला पण... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

निघाले खगोलप्रेमी धूमकेतू पाहायला पण...

 निघाले खगोलप्रेमी धूमकेतू पाहायला पण...

चांदबिबी परिसरात दिसला बिबट्या.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील व्हर्सटाईल ग्रुप या खगोलप्रेमी ग्रुपने आयोजित केलेल्या आकाश दर्शन या कार्यक्रमांतर्गत धूमकेतू पाहण्याचा कार्यक्रम चांदबीबी महाल येथे आयोजित केला असता खगोलप्रेमींना अचानक बिबट्याचे दर्शन घडले.
नगर येथील व्हर्सटाईलग्रुप अहमदनगर  या खगोलप्रेमी ग्रुपने चांदबीबी महाल याठिकाणी आकाश दर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. .रात्रीच्या  आकाशात नुकताच दिसू लागलेला कॉमेंट सी /2021ए 1लिओनार्डो नावाचा धूमकेतू प्रदीर्घ लंब वर्तुळाकार प्रवास करीत आहे.हेच निमित्तसाधून व्हर्साटाईल ग्रुपने अत्याधुनिक टेलिस्कोपच्या माध्यमातून खगोलप्रेमींसाठी आकाशदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता .या कार्यक्रमाकरिता व्हर्सटाईल ग्रुपचे अमोल सांगळे आणि अनिरुद्ध बोपर्डीकर आपल्या चारचाकी वाहनाने चांदबीबी महालाकडे जात असताना अचानक बिबट्या त्यांचा समोरून शांतपणे गेला.
आपले वाहन थांबवून पहिले असता बिबट्याने मागे वळून पाहिले आणि लगेचच झुडुपामध्ये निघून गेला . या घटनेने क्षणभर स्तब्ध झालेले दोघेही नंतर महालाकडे निघून गेले.चारचाकी वाहनात असल्याने ते सुरक्षित होते .परंतु याठिकाणी फिरायला जाणार्‍या नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.यापूर्वी या भागात बिबट्या दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. नगर शहरातून अनेक जण चांदबीबी महालावर जात  असतात .महिला ,लहान मुले, ज्येष्ठ नागरिक  सुद्धा असतात . वन विभागाचे याकडे लक्ष वेधण्याकरिता व्हर्सटाईल ग्रुप मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देणार आहे अशी माहिती व्हर्सटाईल ग्रुप सदस्य अमोल सांगळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment