“राजाचा पोपट मेला पण,...” मुस्लिम आरक्षणावरून फडणवीसांची टोलेबाजी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

“राजाचा पोपट मेला पण,...” मुस्लिम आरक्षणावरून फडणवीसांची टोलेबाजी

 “राजाचा पोपट मेला पण,...” मुस्लिम आरक्षणावरून फडणवीसांची टोलेबाजी


मुुंबई ः
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. नेहमी प्रमाणं यंदाही अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली. या अधिवेशनात ओबीसी आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेयावरूनच आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कधीकाळी आरक्षणाची मागणी करणार्‍या नवाब मलिकांना धारेवर धरलं. मुस्लीम आरक्षण देता येत नाही असं नवाब मलिकांनी स्पष्ट केल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. तसेच धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोध असल्याचं देखील ते म्हणाले. यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी एक खास गोष्टही सांगितली.
आमच्या काळात मुस्लीम आरक्षणासाठी यांनी फार आंदोलनं केली, मात्र राजकीय हेतुनं प्रेरीत होऊन त्यांनी ती आंदोलनं केली होती. आता सत्तेत आल्यावर यांची भाषा बदलली. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही हे नवाब मलिकांनी स्पष्ट केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना धारेवर धरलं. आम्ही सांगत होतो की, गरीब मुस्लीम समाजाला ओपनमधून आरक्षण मिळत होतं. त्याची माहिती देखील आम्ही दिली होती असंही ते पुढे म्हणाले.
या मुद्दयावर पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. राजाचा पोपट मेलेला असतो, मात्र ते सांगेल राजाला कोण? मग कोणी म्हणतं मान वाकडी झाली, कोणी म्हणतं तो हालचाल करत नाही, कोणी म्हटलं तो खात पीत नाही...मात्र कोणीही सांगत नाही की पोपट मेला. मात्र आज नवाब मलिकांनी अखेर सांगून टाकलं की, राज्यात मुस्लीम आरक्षण मिळू शकत नाही. तसंच पुढे बोलताना देवेद्र फडणवीस असंही म्हणाले की, धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोध आहे. यांनी केंद्रावर लोटण्याचा प्रयत्न केला, मात्र आता अंगावर आल्यानंतर यांनी ही गोष्ट स्पष्ट केली.

No comments:

Post a Comment