कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामांमुळे भाजपाचे प्राबल्य वाढत आहे- भैय्या गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामांमुळे भाजपाचे प्राबल्य वाढत आहे- भैय्या गंधे

कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामांमुळे भाजपाचे प्राबल्य वाढत आहे- भैय्या गंधे 

भाजपाच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः
भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामामुळे देशात आणि अनेक राज्यात भाजपाची सत्ता आली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे पक्षाचे प्राबल्य वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दूरदृष्टीने देशाच्या विकासात मोठे योगदान देत आहेत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावे. त्याचबरोबर पक्षाची ध्येय-धोरणे सर्वांपर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. आज नियुक्त झालेल्या पदाधिकार्यांनी पक्षात चांगल्या पद्धतीने काम केले आहे, त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर पदाच्या माध्यमातून जबाबदारी सोपावली आहे, ही जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या जिल्हा चिटणीसपदी रवि बाकलीवाल, नितीन जोशी,  शरद बारस्कर यांना नियुक्तीचे पत्र शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, सरचिटणीस महेश नामदे, कॅन्टों.बोर्ड उपाध्यक्ष वसंत राठोड, अनु.जाती शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, किशोर कटोरे, लक्ष्मीकांत तिवारी, मल्हार गंधे, किरण जाधव, शशांक कुलकर्णी, सुमित बटुळे आदि उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड.विवेक नाईक म्हणाले, भाजपा पक्षाची वेगळी ओळख आहे, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन जनतेची कामे केली पाहिजे. पदाधिकार्यांनी पक्षाच्यावतीने राबविण्यात येणार्या अभियानात योगदान देऊन पक्ष वाढीसाठी कार्य करावे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन वरिष्ठांकडून केले जाईल, असे सांगितले.नियुक्त झालेले पदाधिकार्यांनी पक्षाने आमच्यावर जो विश्वास दाखविला, त्यास पात्र राहून पक्षाचे काम चांगल्यापद्धतीने करु, असे सांगून आभार मानले.

No comments:

Post a Comment