कल्याण रोड परिसरात अनेक गुणवंतांची खाण- नगरसेवक शाम नळकांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

कल्याण रोड परिसरात अनेक गुणवंतांची खाण- नगरसेवक शाम नळकांडे

 कल्याण रोड परिसरात अनेक गुणवंतांची खाण- नगरसेवक शाम नळकांडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कल्याण रोड परिसरात अनेक गुणवंत विद्यार्थी व रहिवासी रहात आहेत त्यामुळे कल्याण रोड परिसराची नवीन ओळख नगर शहराला होत आहे.  परिसरामध्ये आणि शिक्षक व विविध क्षेत्रातील नोकरवर्ग असून ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत आहे. तसेच अनेक विद्यार्थी अभ्यासात व विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. कल्याण रोड परिसरात अनेक गुणवंतांची खाण आहे हे असे आवर्जून नगरसेवक श्याम भाऊ नळकांडे यांनी खेळाडूंचा सत्कार करताना आपले मनोगत व्यक्त केले.
या सत्कार कार्यक्रमात कु.अर्पिता गोरे हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल, चि.प्रणव धामणे राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी, कु. अंकिता गुंड रशिया येथे एम.बी.बी.एस.साठी प्रवेश, चि. देवेंद्र ढोकळे चेस इन स्कूल प्रशिक्षक व चेस आर्बिटर या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. पारुनाथ ढोकळे सर, श्री. जालिंदर गोरे सर, श्री. संजय झावरे सर, श्री. सुनिल नरसाळे सर,श्री दत्तात्रय धामणे सर, श्री मधुकर बेरड सर, श्री सुनिल रायकर सर, श्री हिरामण गुंड सर, श्री सुनिल कुलट सर, श्री. राजेंद्र झावरे सर, श्री रावसाहेब सांगळे सर, श्री.दत्तात्रय नरवडे सर, श्री बाबासाहेब करांडे सर आदी परिसरातील नागरिक सत्कार समारंभ वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment