मनपा अधिकार्‍यांनी विकला बोल्हेगाव येथील मनपाच्या हक्काचा भूखंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 21, 2021

मनपा अधिकार्‍यांनी विकला बोल्हेगाव येथील मनपाच्या हक्काचा भूखंड

 मनपा अधिकार्‍यांनी विकला बोल्हेगाव येथील मनपाच्या हक्काचा भूखंड

नगरसेवक कुमारसिंह वाकळेंचे मनपा आयुक्तांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 7 या भागातील साईराज उपनगर मधील सर्वेनंबर 68/1/3/4 क्षेत्रांमधील 44 गुंठ्यात महापालिकेचा हक्काचा ओपन स्पेस असतांना महापालिकेतील अधिकार्‍यांनी बांधकाम व्यवसायकाशी हात मिळवणी करून ओपन स्पेसचा रिवाईस प्लॅन तयार करून मंजुरी घेतली आहे व हा भूखंड महापालिका अधिकार्‍यांने त्या बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला असा आरोप नगरसेवक कुमार वाकळे यांनी केला आहे.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाकळे यांनी म्हटले आहे की साईराज उपनगर भागातील रहिवाशांच्या हक्काचा ओपन स्पेस असताना या अधिकार्‍याने महापालिकेच्या हक्काच्या जागेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. या ओपन स्पेसमध्ये मनपाने अधिकृतपणे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता या ठिकाणी भव्य दिव्य असे सांस्कृतिक भवन उभे आहे. मंग आता हा ओपन स्पेस अनाधिकृत कसा झाला या ठिकाणी नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस असल्यामुळे दहा-पंधरा वर्षापूर्वी दत्त मंदिर,श्री भगवान बाबा मंदिर,श्री संत वामन बाबा मंदिर,गणेश मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संतराम नागरगोजे सांस्कृतिक भवन या ठिकाणी उभे आहे.बांधकाम व्यवसायिकांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून रिवाईस प्लॅन मंजूर करून घेतला आहे त्यामुळे हे बांधकाम व्यवसायिक नागरिकांना धमकावत आहेत.
 या ठिकाणी उभे असलेले मंदिरे व सांस्कृतिक भवन पाडण्यात येणार आहे या ठिकाणी मोठी दाट लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस आहे, ही मंदिरे पाडल्यास नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील व येथे मोठा अनुचित प्रकार घडू शकतो तरी मनपाने सदर प्रकरणात तात्काळ लक्ष घालून मनपाच्या व नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस लुबाडला जाऊन देऊ नये जर या भागातील मंदिराचे व सांस्कृतिक भवनाच्या एकाही विटे ला हात लावून देणार नाही  जर असे झाले तर कुठल्याही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिला.
 यावेळी भीमसेन कोणते,शेषराव बडे,मोहन पडोळे, गोरख खाडे,गहिरीनाथ बडे, मुरलीधर सुळे,ज्ञानदेव जायभाये,नंदाताई आंधळे,सविता अडसूळ,अनिता सोनवणे,संध्या दिवटे,मनीष नाकडे, संगीता खाडे,कल्पना गुंजाळ, स्वाती काळे, साधना लोंढे, लंका दौंड,प्रमिला गोर्डे, निर्मला चत्तर, उत्तमराव आडसूळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here