भाजपातर्फे नगरमध्ये सुशासन दिनानिमित्त विविध कार्यक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

भाजपातर्फे नगरमध्ये सुशासन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

 भाजपातर्फे नगरमध्ये सुशासन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी दि.25 रोजी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनी नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने मोदी सरकारच्या 7 वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई-श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिली.
‘अटलजी ते मोदीजी - सुशासनाचा प्रयास’ या विषयावर विविध क्षेत्रातील नामवंतांची व्याख्याने होणार आहेत. तसेच वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, प्राध्यापक, उद्योजक अशा मंडळींचे मेळावे आयोजित करून मोदी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, सुशासन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टाकलेली पावले याची माहिती दिली जाणार आहे. गेल्या 7 वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व अन्य समाजघटकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारी पत्रके बूथ स्तरापर्यंत वितरीत केली जाणार आहेत. या खेरीज सर्व बुथवर अटलजींच्या प्रतिमेला अभिवादन, जनसंघापासून काम करणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, अटलजींच्या कवितांचे जाहीर वाचन, महाविद्यालय परिसरात अटलजींच्या जीवनावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सुशासनाची कल्पना राबविण्यासाठी उपक्रम राबविणार्या भाजपा लोकप्रतिनिधींचा ‘अटल पुरस्कार’ देऊन गौरव केला जाणार आहे, अशा विविध कार्यक्रम होणार असल्याची श्री.भैय्या गंधे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment