जिल्हा, तालुका न्यायालयातील लोक अदालतीत 17,593 प्रकरणे तडजोडीने निकाली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 13, 2021

जिल्हा, तालुका न्यायालयातील लोक अदालतीत 17,593 प्रकरणे तडजोडीने निकाली.

 जिल्हा, तालुका न्यायालयातील लोक अदालतीत 17,593 प्रकरणे तडजोडीने निकाली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन यांचे संयुक्त विदयमाने शनिवार, 11 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत आलेल्या 94,980 प्रकरणांपैकी 17513 प्रकरणे तडजोडीने निकाली काढत 50 कोटी 14 लाख रूपयांची वसूली करण्यात आली.सर्वाधिक प्रकरणे निकाली काढणे व वसुलीत अहमदनगर जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे.
राष्ट्रीय लोक अदालती मध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी, फौजदारी, एन. आय. अ‍ॅक्ट, बँकेची कर्ज वसुली, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, कामगार न्यायालयांतील, कौटुंबिक वादाची, महावितरणाची समझोता योग्य तसेच न्यायालयांत येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे, आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती. अहमदनगर जिल्हयामध्ये 15021 दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर 2468 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच 50 कोटी, 14 लाख 25 हजार 311 रकमेची वसुली करण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयांत हे लोकन्यायालय आयाजित करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment