नवीन मोटार वाहन सुधारित अधिनियम 11 डिसें.पासून लागू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 13, 2021

नवीन मोटार वाहन सुधारित अधिनियम 11 डिसें.पासून लागू.

 नवीन मोटार वाहन सुधारित अधिनियम 11 डिसें.पासून लागू.

वाहनांच्या दंड रकमेत वाढ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लायसन्स शिवाय वाहन चालविणे, बॉडी शिवाय वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, ट्रिपल सीट, कर्नकर्शक हॉर्न वाजविणे, पोलीस इशार्‍याचे पालन न करणे, फोर व्हीलर वाहनांच्या काचांना ब्लॅकशीष, मादक द्रव्य प्राशन करून वाहन चालविणे इ. वाहतूक गुन्ह्यांच्या दंड रकमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आता वाहतूक नियम मोडल्यास खिसा होईल रिकामा कारण आता महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारित) अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करणेबाबत अधिसुचना काढलेली असुन या अधिसुचनेची अंमलबजावणी मुळे 11डिसेंबर पासून वाहनांच्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. दंड टाळण्याकरता वाहनधारकांनी नियमात वाहन चालवावे अन्यथा मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते असे आवहान अहमदनगर शहर वाहतूक पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
काही नियमांमध्ये उल्लंघन केल्यास थेट न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालवताना आपली सर्व कागदपत्रे जवळ ठेवत आणि नियम पाळूनच वाहन चालवावे असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र  भोसले यांनी केली आहे. 11/12/2021 रोजी मध्यरात्रीपासुन खालीलप्रमाणे मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहन धारक यांचेकडुन करण्यात येणारी सुधारीत दंड आकारणी पुढील प्रमाणे - लायसन्स शिवाय वाहन चालविणे - आधी 500 दंड होता सुधारीत दंड 5000
ङबोर्ड शिवाय वाहन चालविणे - (शिकाऊ) 200 आधी 500 दंड होता सुधारित1500
विना हेल्मेट आधी - 500 दंड होता सुधारित 500 पुन्हा केल्यास लायसन्स 03 महिने अवैध
मोबाईलचा वापर आधी - 200 दंड होता सुधारित 500 पुन्हा केल्यास 1500
सिट बेल्टचा वापर न करणे आधी - 200 दंड होता सुधारित 500 पुन्हा केल्यास 1500
ट्रिपल सिट आधी - 1000 दंड होता सुधारित लायसन्स 03 महिने अवैध
राँग साईने वाहन चालविणे - 1000 न्यायालयात खटला
कर्णकर्कश हॉर्न वाजविणे - आधी 200 सुधारीत1000 पुन्हा केल्यास 2000
पोलीस ईशान्याचे पालन न करणे - आधी 200 दंड होता सुधारित 500 पुन्हा केल्यास 1500
ब्लॅक फिल्म - आधी 200 दंड होता सुधारित 500 पुन्हा केल्यास 1500
मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणे - न्यायालयात खटला
त्यामुळे वाहनचालकांनो आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना लक्षात ठेवा आपली एक चुकी आपला खिसा रिकामा करू शकते त्यामुळे वाहन चालवताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच वाहन चालवा.

No comments:

Post a Comment