सुज्ञ नागरिक प्रवीण परदेशींना निवडून देतील - खा.सुजय विखे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 13, 2021

सुज्ञ नागरिक प्रवीण परदेशींना निवडून देतील - खा.सुजय विखे.

 सुज्ञ नागरिक प्रवीण परदेशींना निवडून देतील - खा.सुजय विखे.

भाजपा उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 2023 साली होणार्‍या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा सर्व जागा स्वतंत्रपणे लढवून सत्ता मिळवेल. याची सुरुवात या पोटनिवडणुकीत होणार आहे. या प्रभागातील नागरिक सुज्ञ असून, विकास कोणी केला हे चांगल्या पद्धतीने माहित असल्याने ते भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यासारख्या विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवारांस निवडून देतील असा विश्वास आहे. या उमेदवारास पक्षासह आपण सर्वोतोपरि मदत करणार असल्याचे प्रतिपादन खा. डॉ.सुजय विखे यांनी केले आहे.
प्रभाग क्र.9च्या पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ खा.डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. खा.सुजय विखे याप्रसंगी म्हणाले की, नगर गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत भाजपाचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या काळात केंद्र शासनच्यावतीने विविध योजना नगर शहरात राबविण्यात आल्या. अमृत योजना, उड्डाणपुल यासारखी मोठी कामे झाल्याने शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे. अशीच कामे यापुढेही होणार आहेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, हा प्रभाग भाजपाचे उपमहापौरांचा असल्याने गेल्या काळात या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली गेले आहेत. येथील मतदार हे नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत, त्यामुळे सातत्याने या भागातून भाजपचे उमेदवार विजय होत आहेत, आता प्रदीप परदेशी यांचाही विजय निश्चित आहे. महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, आपल्या महापौर पदाच्या काळात केंद्र व राज्य शासनाकडून नगर शहराच्या विकासासाठी विविध माध्यमातून मोठा निधी आणून कामे मार्गी लावाली, आजही अनेक कामे सुरु आहेत.  भाजपाच्या काळात खर्‍या अर्थाने नगर शहराचा विकास झाला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार नक्कीच विजय होईल अशी खात्री आहे. याप्रसंगी माजी उपमहापौर मालनताई ढोणे, सुनिल रामदासी, अभय आगरकर, वसंत लोढा आदिंनी भाजपाचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, अ‍ॅड.अभय आगरकर, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, कॅन्टों.बोर्ड उपाध्यक्ष वसंत राठोड, अ‍ॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दहिंडे, अजय चितळे, सुरेखा विद्ये, शुभांगी साठे, अंजली वल्लाकट्टी, संतोष गांधी, कालिंदी केसकर, महेश तवले, कुसूम शेलार, लिला आग्रवाल, दिलीप भालसिंग, जगन्नाथ निंबाळकर, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, सुधीर मंगलाराम्, प्रशांत मुथा, सुमित बटूळे, बंट्टी ढापसे, शशांक कुलकर्णी, बबन गोसकी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment