नगर गो-हत्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनलंय. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 30, 2021

नगर गो-हत्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनलंय.

नगर गो-हत्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनलंय.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे आयुक्तांना निवेदन.
कत्तलखाने उध्वस्त करा, बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा, अन्यथा आंदोलन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राज्यात गो हत्या बंदी कायदा असताना मनपा प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व कचरा संकलन एजन्सीच्या छुप्या पाठबळावर नगर शहर हे गो हत्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनले असून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्यामागे महापालिका प्रशासन असल्याचा आरोप करीत बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे कत्तलखाने त्वरित उध्वस्त करावे, अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरील मागण्यांचे लेखी निवेदन दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी दिलेले आहे.तसेच आपले गैरहजेरीत 20 डिसेंबर रोजी उपयुक्त यशवंत डाके यांच्याशी वरील मागण्यांसाठी आमचे शिष्टमंडळाने भेट घेऊनही आपल्याकडून गांभीर्याने दखल घेतली नसल्याबाबतची नाराजी व्यक्त करून आपणास याबाबत त्यांचा अहवाल सादर करण्याची विनंती केलेली होती. आज पावेतो आपल्याकडून याबाबत काही ठोस कारवाई करण्याचे नियोजन केल्याचे दिसून येत नाही. तरी आज आम्ही आपणास अंतिम इशारा देत आहोत की आपण याबाबत त्वरित कारवाई करण्याचे नियोजन करावे.अन्यथा विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व व्यापारी संघटना सहित आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता या पत्राच्या विषयात नमूद केलेल्या कोणत्याही ठिकाणी जाहीर ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल याची नोंद घ्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे.
बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या निवेदनात बाजारपेठेतील अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून नगर शहरातील कापड बाजार,मोची गल्ली, चितळेरोड, आशा टॉकीज चौक,माळीवाडा व जिल्हा परिषद परिसर येथील सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या फेरीवाल्यांची अतिक्रमणे कायमस्वरूपी काढण्याच्या अनुषंगाने ठोस कारवाई होणे बाबत तसेच शहरातील अवैध कत्तलखाने त्वरित उध्वस्त करावेत.या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शहरातील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या भागात सर्व फेरीवाल्यांची मक्तेदारी झाल्याचे वास्तव आहे.व आपल्या महानगरपालिका प्रशासनाची निष्क्रियता त्यास जबाबदार आहे.या परिस्थितीमुळे ते सर्वसामान्य नागरिकांच्या पायी व दुचाकी वाहनातून होणारे वाहतुकीस फार मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. व त्यामुळे तेथे नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.तो इतका की कोणी नागरिक तेथील अधिकृत दुकानात खरेदीसाठी जाऊ शकत नाही.दुचाकी गाड्या पार्किंग केल्यास हे फेरीवाले त्यास मज्जाव करतात.एकत्र येऊन त्या नागरिकास दमदाटी करून जबर मारहाण देखील करतात.तसेच महिला व तरुण मुलींची छेडछाड करणे,चैन व पर्स स्नॅचिंग करणार्‍या समाज कंटकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करतात. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून क्वचितच थातूरमातूर कारवाई केल्याचे नाटक करीत असल्याचे दिसून आले आहे.वाढती लोकसंख्या व वाढती रहदारी लक्षात घेता हे सर्व परिसर नो हॉकर्स झोन म्हणून त्वरित घोषित करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मोहीम त्वरित सुरू करून ही मोहीम सतत राबवित ठेवून फेरीवाल्यांची तेथील मक्तेदारी कायम स्वरूपी मोडीत काढावी. असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख डॉ.मिलिंद मोभारकर,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,विशेष सल्लागार निलेश चिपाडे,बजरंगदल शहर संयोजक कुणाल भंडारी,जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख दिग्विजय बसापुरे,जिल्हा गौरक्षा प्रमुख दीपक फुलडहाळे,शहर गौरक्षाप्रमुख दीपक वांढेकर,अनिल राऊत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment