जेऊर परिसरातील मंदिरात चोरीच्या घटना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 28, 2021

जेऊर परिसरातील मंदिरात चोरीच्या घटना

 जेऊर परिसरातील मंदिरात चोरीच्या घटना.

भैरवनाथाचा घोडा, बहिरोबा मळ्यातून घंटा अन् बायजामाताची कळशी चोरीला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जेऊर गावातील ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तांब्याची भांडी, कळशी, समई, पंचपाळे, ताट याची चोरी केली. तसेच इमामपूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात तीन किलो वजनाचा पितळी घोडा, तसेच पाच किलो वजनाची एक घंटा व सात किलो वजनाच्या दोन घंटा चोरट्यांनी चोरून नेल्या. इमामपूर येथील मळगंगा माता मंदिर बहिरोबा मळा येथील एक समई व दोन घंटा तसेच इमामपूर घाटातील गणपती मंदिर येथील समई व दोन घंटा चोरून नेल्या आहेत. जेऊर परिसरात चोरट्यांनी मंदिरे टार्गेट केल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.रविवारी दि.26 च्या मध्यरात्री या चोरीच्या घटना घडल्या आहेत.
घटनास्थळी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनोद जाधोर, दीपक गांगर्डे, कावरे यांनी भेट दिली. याप्रसंगी इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, बाजीराव आवारे, भानुदास आवारे, बाबासाहेब आवारे, सुदाम आवारे, विकास हम्स्के, मधुकर म्हस्के उपस्थित होते.

No comments:

Post a Comment