राज्यपालांच्या विनंतीला आम्ही मान दिला - महसूलमंत्री थोरात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 29, 2021

राज्यपालांच्या विनंतीला आम्ही मान दिला - महसूलमंत्री थोरात.

 राज्यपालांच्या विनंतीला आम्ही मान दिला - महसूलमंत्री थोरात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांची कार्यक्रमाकडे पाठ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आम्ही विधान सभेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत ते कायदेशीर केले आहेत त्यामध्ये कुठलेही चुकीचं नाही. पार्लमेंटमध्ये अध्यक्ष निवडण्याची जी पद्धत राबवली जाते त्यानुसारच आम्ही हे बदल केले आहेत. आम्ही जे बदल केले आहेत ते घटनात्मक नसल्याचं राज्यपाल म्हणत आहेत. आमच्यामध्ये विचारांचे मतभेद आहेत. राज्यपालांच्या पत्रामध्ये जी भाषा लिहिली गेली आहेत त्यावर त्यांना आक्षेप कुठल्या शब्दांवर आहे हे आम्हाला माहीत नाही. राज्यपालांच्या विनंतीला आम्ही मान दिला असून आम्ही थांबलो आहोत असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना आज व्यक्त केलं आहे.
अहमदनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबद्दल तसेच भाजप आमदार नितेश राणे आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेल्या बायो- डिझेल प्रकरणाबद्दल पत्रकारणांशी संवाद साधला. या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रकारणाची चांगली चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नुकतेच विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाची निवड होणार होती मात्र या निवडणुकीच्या प्रक्रियांमध्ये महाविकास आघडी सरकारने केलेल्या काही बदलावामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निवडणुकीला मंजुरी नाकारली. यावरही थोरात यांनी भाष्य केलं.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देत थोरात म्हणाले. विधानसभेची एक प्रतिष्ठा आहे ती सर्वांनी राखली पाहिजे विधानसभेच्या आवारात अशा प्रकारे आवाज काढणं, कोणाची नक्कल करणं हे बरोबर नाही. विधानसभेला मोठे वैभव आहे. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. अशाप्रकारे वागणं हे बरोबर नाही यावर आमचं सर्वांचं एक मत आहे. जिल्हयासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलेला बायो डिझेल प्रकरणाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले बनावट बायोडिझेल प्रकरणांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल करताना किंवा तपास करताना आरोपींना पाठीशी घातले जात आहे हे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये चुकीचं वागणार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. काही दिवसांपूर्वी जिल्हयात या प्रकरणात काही आरोपीना पाठीशी घालण्याचा काम सुरु असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता महसूल मंत्री थोरात यांनी कारवाईचे आदेश दिल्याने या प्रकरणात काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे. विधानसभा अध्यक्षपद निवड टाळून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांचा सन्मान राखला आहे. वास्तविक सरकारने निवड पद्धतीविषयी घेतलेला निर्णय योग्यच होता, असे ही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत नगर-औरंगाबाद महामार्ग जवळ उभारण्यात आली आहे. या इमारतीचा उदघाटन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह नगर जिल्ह्यातील दोन खासदार व बारा विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे असे एकूण 14 आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले होतं. प्रत्यक्षात या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे दिसले. तर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहता स्वतःच व्हिडिओ कॉन....... द्वारे कार्यक्रमात भाग घेवून  शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके,संग्राम जगताप,  किरण लहामटे, आशुतोष काळे, विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारती उदघाटन कार्यक्रमाला येणे का टाळले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख ,महापौर रोहिणी शेडगे ,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले ,खासदार सदाशिव लोखंडे ,आमदार बबनराव पाचपुते ,आमदार लहू कानडे ,आ सुधीर तांबे ,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे ,जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर ,पदमश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार ,राहीबाई पोपरे ,अधीक्षक अभियंता कुलकर्णी आदी उपस्थित होते . यावेळी त्यांनी इमारतचे रिबन कापून उद्घाटन केले ,कोनशिला अनावरण ,जिल्हाधीकारी यांचे कार्यलयची पाहणी ,सभागृहाची पाहणी आदी केली.

No comments:

Post a Comment