18 वर्षीय युवतीचा विष प्राशनामुळे मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 29, 2021

18 वर्षीय युवतीचा विष प्राशनामुळे मृत्यू.

 18 वर्षीय युवतीचा विष प्राशनामुळे मृत्यू.

घातपाताचा संशय; पळून गेलेला इसम कोण?


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील जोहरवाडी येथील एका 18 वर्षीय तरुणीचा विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे मृत्यू झाला असून सविता ज्ञानदेव वांढेकर असे मयत तरुणीचे नाव असून ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.
जोहारवाडी खांडगाव रस्त्याच्या कडेला राहत असलेले ज्ञानदेव वांढेकर सोमवारी घराजवळील डाळिंबाच्या बागेत काम करत होते त्यावेळी घरात सविता एकटीच होती. सविताची आई आणि भाऊ योगेश हे लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना ज्ञानदेव यांना घरातून कसलातरी आवाज आला. म्हणून ते घराकडे गेले असताना त्यांच्या घरातून एक अज्ञात व्यक्ती पळून जाताना दिसली. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात पळून गेला तो इसम कोण ? याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून सविता हिचा घातपात त्यामध्ये त्याचा काही हात आहे का ? याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. सविता यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समोर येणार असल्याने सध्यातरी मृत्यू मागचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र परिसरातील नागरिकांकडून सविता वांढेकर यांची आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सविता वडील ज्ञानदेव यांनी आरडाओरडा केला त्यावेळी पळून जाणारा व्यक्ती त्याची मोटारसायकल देखील घरासमोरच सोडून गेला. ज्ञानदेव यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांची मुलगी सविता हिने विषारी पदार्थ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिला तात्काळ दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. नगर येथील जिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करुन मंगळवारी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment