कुप्रसिद्ध आकाश डाके टोळीवर मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

कुप्रसिद्ध आकाश डाके टोळीवर मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल

 कुप्रसिद्ध आकाश डाके टोळीवर मोक्कान्वये दोषारोपपत्र दाखल

तोफखाना पोलीस स्टेशन आवारात चाकू,कोयते घेऊन भांडण करणे भोवले..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यात संघटीत गुन्हा करणार्‍या कुप्रसिद्ध मोक्का लागलेल्या आकाश डाके टोळीवर विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला.त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले. त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी सचिन निकम यांचे फिर्यादी वरून कुप्रसिद्ध आकाश डाकेच्या टोळीतील गणेश कु-हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके, बाळासाहेब वाघमारे आणि दोन विधि संघर्शित बालक यांचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
आकाश डाके टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून, हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या टोळी विरुद्ध  मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणे करिता  विशेष पोलीस  महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास श्रीरामपूरचे ऊू.ी.ि.संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात आकाश डाके टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (ळळ) ,3(2), व 3(4) मोक्का अन्वये अपर पोलीस महासंचालक  (का व सू) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली. गुन्ह्याचा तपास बी. जी. शेखर पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र), मनोज पाटील (पोलीस अधीक्षक अहमदनगर), सौरभ अग्रवाल (अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके डिवायएसपी श्रीरामपुर यांनी करून विशेष मोकका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपास कामात त्यांना पीआय गडकरी, पीएसआय समाधान सोळांखे, एएसआय राजू भालसिंग, पीएन किरण बनसोड यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment