हूरड्यामुळे साईबन कृषी पर्यटन केंद्रात गर्दी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

हूरड्यामुळे साईबन कृषी पर्यटन केंद्रात गर्दी

 हूरड्यामुळे साईबन कृषी पर्यटन केंद्रात गर्दी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः निसर्गाच्या सानिध्यातील असलेल्या नगरजवळील साईबन कृषी पर्यटन केंद्रात मध्ये हुरडा सुरु झाला असून या कालावधीत असंख्य  लोकांनी त्याचा आस्वाद घेतलं तर हुरडासाठी सध्या गर्दी होत आहे तर सुट्टीच्या दिवशी बुकिंग फुल होत आहे अशी माहिती डॉ प्रकाश कांकरिया यांनी दिली
साईबन कृषी पर्यटन केंद्राचा परिसरात सर्वत्र हिरवा झालेला असून मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी व मनोरंजन करणारे प्राणी, आंब्याच्या झाडाखाली वन भोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा, चटण्या, गुडीशेव, रेवडी गोड आंबट बोरे, पेरूच्या फोडी व उसाचा रस हे सर्व असलेल्या साईबन मध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद. माळरानावर अवतरलेला संपूर्ण स्वर्गच आपल्या हाती आला कि काय असे वाटू लागते
पपेट शो आणि बैलगाडी हे एक विशेष आकर्षण आहे.डोनाल्ड डक, मिकी माउस व अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या, त्याच्या बाजूने जाणारया रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत, जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित काणारे आहेत. नगर जिल्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येने साईबनच्या हुरडा पार्टीसाठी येत आहेत. सुट्टीच्या दिवशी तर मोठी गर्दी असते त्यासाठी आधी बुकिंगची सोय उपलब्ध आहे तसेच हुरडा व जेवणासह वाजवि दराचे प्याकेज उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment