देवस्थान जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

देवस्थान जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार.

 देवस्थान जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार.

कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कर्जत येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात रेहेकुरी येथील देवस्थानच्या जमिनीच्या वादातुन बाचाबाची होऊन एका व्यक्तीने हवेत गोळीबार करण्याची घटना घडली आहे, आरोपीस हत्यारासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे, आरोपीकडे लायसन असलेले रिव्हॉल्वर होते ते आणि 5 जिवंत राऊंड आणि 1 वापरलेला राऊंड जप्त केला आहे.
याबाबत रेहेकुरी येथील भरत नामदेव मांडगे वय 45 वर्षे धंदा शेती यांनी कर्जत पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली असून यामध्ये म्हटले आहे की मौजे रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमिन गट नं. 70, 71, 72, 73 या चार गटामध्ये एकुण 75 एकर क्षेत्र आहे, सदरचे क्षेत्र हे बरेच वर्षापासून फिर्यादीच्या भावकीतील पुर्वीचे चार कुटूंब वहीत करून खात होते व कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो, परंतु फिर्यादीच्या भावकीतील संदिप छगन मांडगे याने  देवस्थानाचे नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याने घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. यानंतर संदिप छगन मांडगे याने  दुस-या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही व वरील चारही गटातील शेतजमीनीच्या इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कर्जत येथे दावा दाखल केलेला आहे. त्यावरून फिर्यादी व फिर्यादीच्या भावकीतील लोक आज दि. 30-12-2021 रोजी उपविभागीय दंडाधिकारी कर्जत येथे तारीख असल्याने आलेले होते. उप विभागीय दंडाधिकारी  कर्जत येथील तारीख झाल्यानंतर फिर्यादी व इतर शांतीलाल बाबु मांडगे वय 60 वर्षे, रोहीदास खंडू मांडगे वय 75 वर्षे, शहाजी बाबू मांडगे वय 55 वर्षे, आश्रु यशवंता मांडगे वय 70 वर्षे, भानुदास यशवंत मांडगे वय 80 वर्षे, हारीभाऊ आन्ना मांडगे वय 55 वर्षे, नारायण देवीदास मांडगे वय 50 वर्षे, आप्पा गंगाराम मांडगे वय 55 वर्षे, धनराज खंडू मांडगे वय 50 वर्षे सर्व रा. रेहकुरी ता. कर्जत जि. अहमदनगर असे सर्वजण सांयकाळी 6 वा चे सुमारास कर्जत येथील उप विभागीय दंडाधिकारी कर्जत यांच्या कार्यालयाजवळील गेटजवळ थांबले  असताना त्यावेळी आरोपी संदिप छगन मांडगे वय 32 वर्षे व सचिन छगन मांडगे वय 30 वर्षे दोघे रा. रेहकुरी ता. कर्जत येथे आले, यावेळी फिर्यादी भरत नामदेव मांडगे याचा  चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटार सायकल फिर्यादीला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने ते सदर मोटारसायकल घेवून घरी निघाले होते. त्याचवेळी संदिप छगन मांडगे याने फिर्यादिस ए कुत्र्या मोटारसायकल घेवून जावू नको खाली उतर असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून चापटाने मारहान केली, त्यावेळी फिर्यादी व आरोपी यांच्या मध्ये शाब्दीक बाचाबाची होवून झटापट चालू असताना संदिप छगन मांडगे याने त्याचे कंबरेचा रिव्हालव्हर काढून फिर्यादी व त्याचे सोबत असलेले वरील नातेवाईक यांच्या जिवीतास धोका होऊ शकतो हे माहीत असताना रिव्हालव्हर मधून हवेत फायर केला. त्यानतंर संदिप छगन मांडगे हा निघून गेला. याबाबत माहिती फोनवरून मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट दिली, आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment