अलविदा 2021.. वेलकम 2022 - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

अलविदा 2021.. वेलकम 2022

 अलविदा 2021.. वेलकम 2022

आज 31 डिसेंबर!
नववर्षाच्या स्वागताला नगरकर सज्ज; गैरवर्तन करणार्‍यांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासन सज्ज.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज 31 डिसेंबर... म्हणजेच यावर्षाचा शेवटचा दिवस. नगरकरांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. मात्र, ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळं त्या तयारीवर काही मर्यादा आल्या आहेत. असं असलं तरीही अनेकांनी घरगुती स्वरुपात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे. आता अवघ्या काही तासांनंतर नवीन वर्षाचं आगमन होईल. त्यानिमित्त नवीन संकल्प केले जातील. येणारं वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन यावं, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी पोलिसांची तयारी पूर्ण झाली असून, गच्चीवरील पार्ट्यांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही हे पोलीस पाहणार आहेत. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती दखल घेतली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता पोलिसांनी रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू केली आहे, रात्री सर्व हॉटेलला राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस फटाके फोडण्यास बंदी घालणयात आली आहे, त्यामुळे कोणीही फटाके फोडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे आगमन भयरहित, शांततामय परिस्थितीत करता यावे म्हणून पोलीस सज्ज झाले आहे. नगर शहरात 31 डसेंबरला कोणतीही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून 800 पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणार्‍यांविरोधा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 31) थर्टी फर्स्ट आणि उद्या शनिवारी (ता.1) नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जे नियम लागू केले आहेत, त्या नियमांचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पालन करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
)सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, पार्ट्या करणे, रात्री-अपरात्री नियमबाह्य पद्धतीने फटाके वाजवणे या सर्वांवर निर्बंध लावण्यात आले आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करूनच सरत्या वर्षाला निरोप द्यावा व नवीन वर्षाचे स्वागत करावे. नवीन वर्षाची सुरूवात चांगल्या पद्धतीने व्हावी. कोरोनाचा प्रार्दुभाव पसरणार नाही, याची काळजी घ्यावी.दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने यावर पोलिसांची नजर असणार आहे. पार्ट्या करणे, गर्दी जमवणे किंवा रात्रीच्यावेळी दारू पिऊन वेगात वाहने चालविणे यावर पोलिस लक्ष ठेवणार आहेत. आज थर्टी फर्स्टच्या दिवशी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.
नवीन वर्षाचं आगमन करण्यासाठी अगदी काही अवधी उरला आहे. फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग 2022 या नव्या वर्षाचं स्वागत करणार आहे. मात्र प्रत्येकाच्या स्वागताची पद्धत ही मात्र वेगळी असणार आहे. चला तर जाणून घेऊया न्यू ईयर साजरा करण्याची इतर देशांची काय पद्धत आहे. ब्राझीलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्याची अनोखी परंपरा आहे. या दिवशी लोकं खाण्यावर अधिक भर देतात. या ठिकाणी असं मानलं जातं की, डाळ खाल्ल्याने घरात समृद्धी येते. जपानमध्येही नवीन वर्षाचं स्वागत करण्याची अनोखी पद्धत आहे. यामध्ये छशु धशरी र्एींशला घंटी वाजवण्यात येते. यामध्ये लोकं दिवसातून 108 वेळा घंटी वाजवतात. घंटी वाजवण्याला या ठिकाणी शुभ मानलं जातं. आफ्रिके नवीन वर्षाला आगळीवेगळी परंपरा मानली जाते. आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये लोकं त्यांच्यासाठी आवश्यक नसलेल्या गोष्टी फेकून देऊन नवीन वर्ष घरी साजरं करतात. या दिवशी लोक त्यांचं जुने फर्निचरसारख्या वस्तू फेकून देतात. यामुळे त्यांचं येणारं वर्ष चांगलं जाईल असा लोकांचा विश्वास आहे. स्पेनमधील लोकं जसे घड्याळात 12 वाजतात तसे प्रत्येक तासाला 12 द्राक्षे खाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. येणारे 12 महिने भाग्याचे असतील असा यामगे त्यांचा विश्वास आहे.

No comments:

Post a Comment