माझे पतीवरील खोटा गुन्हा रद्द करावा- सौ.मीना मोकाटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 15, 2021

माझे पतीवरील खोटा गुन्हा रद्द करावा- सौ.मीना मोकाटे

 माझे पतीवरील खोटा गुन्हा रद्द करावा- सौ.मीना मोकाटे

जिल्हा पोलिस अधिकक्षकांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माझे पती गोविंद मोकाटे यांना ब्लॅकमेल करून अनेक महिन्यांपासून काही व्यक्तींकडून पैशाची मागणी करण्यात येत होती. ज्या दिवशी फिर्याद देण्यात आली ती खोटी असल्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. फिर्यादी तसेच फिर्यादीचे पती व सामाजिक कार्यकर्ता व त्यांना सहकार्य करणार्‍या सर्व लोकांचे मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड व मेसेज तपासणे गरजेचे आहे. तसेच फिर्यादीचे व्हाट्सअप चॅटिंग, फेसबुक अकाउंट, मेसेंजर, टेक्स्ट मेसेज व कॉल ची तपासणी करावी व नगर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गोविंद मोकाटे यांच्यावर झालेला गुन्हा संपूर्ण खोटा दाखल केला असून तो रद्द करण्याची मागणी मोकाटे यांच्या पत्नी सौ. मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  जिल्हा पोलिस प्रमुखांना सदर गुन्हा खोटा व बनावट असल्याबाबतचे सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत. पुराव्यांवरुन चौकशी करुन खोटा गुन्हा दाखल करणा-या व ब्लॅकमेल करणार्‍या लोकांना तसेच त्यांना सहकार्य करणार्‍या लोकांची चौकशी करून कडक रवाई करण्याची करण्यात आली आहे. तसेच दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी .सौ. मोकाटेंकडुन करण्यात आली आहे.
तोफखाना पोलीस स्टेशन येथे माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर दिनांक 4 डिसेंबर रोजी भा.दं.वि. कलम 376,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी आज गोविंद मोकाटे यांच्या पत्नी सौ. मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन सदर गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदनामध्ये गोविंद मोकाटे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जेऊर गटातून प्रबळ उमेदवार होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचत एका महिले मार्फत खोटा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये गोविंद मोकाटे यांचा कुठलाही संबंध नाही. खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतविण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता व त्यांना सहकार्य करणार्‍या इतर दोन व्यक्तींची नावे टाकण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here