सेप्टीक टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू; एक जखमी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 27, 2021

सेप्टीक टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू; एक जखमी.

 सेप्टीक टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू; एक जखमी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः साहेबराव भागाजी खेसे वय वर्षे 50 रा.निंबळक (घरमालक) व अरुण श्रीधर साठे वय 35 रा.नागापूर (कामगार) यांचा काल दुपारी निंबळक शिवारात शौचालयाच्या सेपक्टीक टँक मधून मैला काढण्याचे काम चालू असताना सेपक्टीक टँक मध्ये पडून मृत्यू झाला. दुसरे कामगार अशोक साठे हे याच कामात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निंबळक मधील पांडूरंग नगर परिसरात साहेबराव खेसे यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सेपक्टीक टँक भरल्यामुळे त्यातील मैला काढण्यासाठी त्यांनी काल दुपारी दोन कामगारांना बोलविले होते. टँकमधील मैला काढत असताना एक कामगार टँकमध्ये पडला. त्यापाठोपाठ दुसरा कामगारही टँकमध्ये पडला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना मालक साहेबराव टँकमध्ये पडले. त्यातील एका कामगाराला बाहेर काढण्यात यश आले.
मालक साहेबराव व कामगार अरूण साठे यांचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती निंबळक शिवारात पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळल्यानंतर सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

No comments:

Post a Comment