के. के. रेंजवर लष्कराचा सराव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 27, 2021

के. के. रेंजवर लष्कराचा सराव.

 के. के. रेंजवर लष्कराचा सराव.

अवाढव्य रणगाडे.., तोफांचे आवाज.., गोळीबार.., धुरांचे लोट.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अवाढव्य रणगाडे,कानठळ्या बसणार्‍या तोफांचे आवाज, गोळीबार आणि धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करून जाणारे लष्करी जवान असा युद्ध सराव के के रेंज वर प्रात्यक्षिकांमध्ये आज पाहावयास मिळाला. धाड धाड करत आगीचे गोळे ओकत येणारे रणगाडे क्षणात दूरवर असलेले टार्गेट उडवणारे तोफेचे गोळे आणि युद्धात कशा प्रकारे शत्रूला नामोहरम करण्यासाठी वापरली जाणारी युद्धनीती आज पाहायला मिळाली ती नगर जवळील के.के.रेंज युद्ध सरावाच्या भूमीवर पहावयास मिळाला.सध्या लष्कराच्या वतीने युद्ध सराव सुरू असून लष्करातील अधिकार्‍यांसमोर आज तब्बल दोन तास युद्ध सराव रंगला.
सुरुवातीलाच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उभारण्यात आलेले वेलकम वर तोफांचा मारा करून युध्द सरावाला सुरुवात झाली.लष्करी प्रात्यक्षिकात मुख्य आकर्षण रणगाडे होते अर्जुन, अजय, भीष्म, टी-72, टी-90, बीएमपी-2 या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-90 या संगणकप्रणालीने युक्त असणा-या रणगाड्यांमध्ये अतिउच्च पंधरा धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रणगाड्यांमध्ये गन, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे.प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना पाहण्यासाठी युद्धात वापरल्या जाणार्‍या साधनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.तर रणगाडे जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

No comments:

Post a Comment