एसटी ड्रायव्हरच्या घरावर दरोडा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 27, 2021

एसटी ड्रायव्हरच्या घरावर दरोडा.

 एसटी ड्रायव्हरच्या घरावर दरोडा.

93 हजार किमतीचे सोने व रक्कम लुटली


जामखेड -
जामखेड मधील शिक्षक कॉलनी येथे एसटी ड्रायव्हर विजय नवनाथ खुपसे यांचे घरावर पहाटे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी किचनचा दरवाजा तोडून खूपसे यांना तलवारीचा धाक दाखवून 93 हजार किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात पाच दरोडेखोरांनविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की खूपसे घरात झोपलेले असताना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास  पाच दरोडेखोरांनी कीचनचा दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. खूपसे यांना तलवारीचा धाक दाखवून बेडरुममधील कपाट तोडले. कपाटातील 93 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. दरोडेखोरांचा मागमूस काढण्याकरिता अहमदनगर येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment