देवाचे सामर्थ्य जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ - रेव्ह. शरद गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

देवाचे सामर्थ्य जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ - रेव्ह. शरद गायकवाड

 देवाचे सामर्थ्य जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ - रेव्ह. शरद गायकवाड

अहमदनगर पहिली मंडळी चर्च चा वर्धापन दिन उत्साहात साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारता हा विविध जाती-धर्माने,संस्कृतीने व परंपरेने नटलेला देश आहे.मंदिराच्या माध्यमातून अध्यात्मिकता व धार्मिकता वाढण्यास रमदत होत असते ख्रिस्ती धर्मातील देव माणसा मध्ये आला आहे. प्रत्येकाने प्रार्थना, भक्ती यांवर विश्वास ठेवला पाहिजे, मंदिर हे शुद्ध व आदर्श असले पाहिजे हा आदर्श येशू ख्रिस्त यांनी घालून दिला आहे. मंदिर हे देवाच्या आशीर्वादाने निर्माण झाले आहे प्रत्येक व्यक्ती देवाप्रमाणे पवित्र असला पाहिजे, मंदिराचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होत असतो मंदिरातील भक्ती समाजामध्ये प्रकट केली पाहिजे देवाची उपासना खर्‍या पद्धतीने केली पाहिजे. बलाढ्य, सत्ता देवाच्या विरोधात गेल्याने त्यासुद्धा परमेश्वराने पलटून टाकले आहे देवाचे सामर्थ्य हेच या जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे. देवाच्या सामार्थ्या खाली जीवन जगलो तर मनुष्य आशीर्वादाने पवित्र होत असतो असे प्रतिपादन नाशिक धर्म प्रांत रेव्ह. शरद गायकवाड यांनी व्यक्त केले.
अहमदनगर पहिली मंडळी चर्चचा 18 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करून उपस्थितांना रेव्ह.शरद गायकवाड यांनी संदेश दिला यावेळी रेव्ह.सौ.मेघना गायकवाड अ.प.मं.चे आचार्य रेव्ह. जनार्दन वाघमारे, रेव्ह अनिल वंजारे, रेव्ह समीर गायकवाड, योहान पाटोळे, रेव्ह येशुदास पंडीत, रेव्ह डि.डि.सोनवणे, सौ अनिता जे वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते. नाताळनिमित्त अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून नाताळ सण हा पारंपारिक पद्धतीने साजरा केला जात आहे अशी माहिती सचिव अमोल लोंढे, अहमदनगर पहिली मंडळीचे सेक्रेटरी अमोल लोंढे, खजिनदार सॅम्युवेल खरात, कार्यक्रम समिती अध्यक्ष राहुल थोरात, सुनित ढगे, अजित ठोकळ, शिरीष लाड, ईदरनिल देठे, गिरीष शिरसाठ, श्रीकांत गायकवाड, प्रसन्ना शिंदे, शिल्पा खरात, अर्चना लोखंडे, सौ कुसुम थोरात, तरूण संघ अध्यक्ष हर्षल जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment