भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीने केला सत्कार; महाविकास आघाडी नेत्यांकडे अहवाल पाठविण्याची जिल्हाध्यक्षांकडे मागणी करणार - मनोज गुंदेचा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, December 25, 2021

भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीने केला सत्कार; महाविकास आघाडी नेत्यांकडे अहवाल पाठविण्याची जिल्हाध्यक्षांकडे मागणी करणार - मनोज गुंदेचा

 भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादीने केला सत्कार; महाविकास आघाडी नेत्यांकडे अहवाल पाठविण्याची जिल्हाध्यक्षांकडे मागणी करणार - मनोज गुंदेचा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये उडालेला धुरळा अजून शमायचे नाव घ्यायला तयार नाही. महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव करत भाजपाने ही जागा आपल्याकडे खेचून घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने लढलेल्या शिवसेना उमेदवार सुरेश तिवारी यांचा पराभव करणार्‍या भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांचा राष्ट्रवादीने चक्क निवडून आल्याबद्दल सत्कार केल्यामुळे समाज माध्यमांवर त्या सत्काराचा फोटो व्हायरल झाला असून शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहेत. या गोष्टीची गंभीर दखल काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आली असून रविवारी शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना राष्ट्रवादीने भाजपच्या केलेल्या सत्काराबाबतचा अहवाल पाठविण्याची मागणी जिल्हाध्यक्ष काळे यांना करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुंदेचा यांनी म्हटले आहे की, एका बाजूला राष्ट्रवादीचे आमदार पुत्र हे महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडतात. तर दुसर्‍या बाजूला त्याच उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर जातीयवादी भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीचे आमदार पिता सत्कार करत त्यांना राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा देतात. ही खेदाची बाब आहे. यातून असा सवाल उपस्थित होतो की राष्ट्रवादीच्या आमदार पिता-पुत्रांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात अंधारातून काम करत महाविकास आघाडी उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून महाविकासआघाडीला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.
गुंदेचा यांनी जुन्या गोष्टीची आठवण या निमित्ताने करून दिली आहे. मागील काळात शिवद्रोही श्रीपाद छिंदम ज्या वेळी उपमहापौर झाला त्यावेळी त्याचा देखील असाच सत्कार राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या कार्यालयात केला होता. आज शिवद्रोही छिंदमच्या जागी रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीतून निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित या प्रभागातील नगरसेवकाचा सत्कार करत ही परंपरा राष्ट्रवादीच्या आमदारांनी जपली असून ही महाविकास आघाडीच्या वैचारिकतेला तडा देणारी आहे. शिवद्रोही श्रीपाद छिंदमच्या जागी निवडून आलेल्या उमेदवाराचा की जो ज्या भाजपच्या तिकिटावर लढलेल्या श्रीपाद छिंदम ने शिवप्रेमींचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अपशब्द काढत राज्यातील व नगर शहरातील तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या होत्या अशा पक्षाच्या उमेदवाराचा सत्कार करण्याची हिंमत राष्ट्रवादीच्या आमदारांची होतेच कशी असा सवाल देखील या निमित्ताने काँग्रेसने उपस्थित केला आहे.
काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आ.अरुण जगताप हे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप परदेशी यांचा सत्कार करतानाचा फोटोच प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या रविवारी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रवादीने भाजपच्या केलेल्या सत्कारा बाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, काँग्रेसचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख ना. उद्धव ठाकरे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आदींना राष्ट्रवादीने भाजपाचा सत्कार केल्याचा अहवाल तसेच या निवडणुकीत अंधारात नेमके घडले काय याचा वस्तुनिष्ठ अहवाल हा महाविकास आघाडीच्या वरील सर्व प्रमुख नेत्यांना पाठविण्याबाबत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष यांच्याकडे मागणी करणार असल्याचे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी आमदार पित्याने केलेल्या या सत्कारामुळे शहरातील राष्ट्रवादी ही नेमकी महाविकासआघाडी समवेत आहे की शहर राष्ट्रवादी ही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला आहे हा यातून सवाल उपस्थित होतो, असे काँग्रेसने म्हटले आहे. महाविकास आघाडीची काही तत्व असून ती तत्व जर पाळली जात नसतील आणि शहरामध्ये राष्ट्रवादी जर भाजपच्या समवेत महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी अभद्र युती प्रकरणानंतर आज देखील भाजपच्या समवेत असेल तर यामुळे महाविकास आघाडी मधील अन्य घटक पक्षांचे अतोनात नुकसान होत असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे या गंभीर बाबी शहर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ब्लॉक काँग्रेसच्या वतीने मांडल्या जाणार असल्याचे गुंदेचा यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here