देशासह भाजपाच्या जडण-घडणीत स्व.अटलबिहारी यांचे योगदान प्रेरणादायी- भैय्या गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

देशासह भाजपाच्या जडण-घडणीत स्व.अटलबिहारी यांचे योगदान प्रेरणादायी- भैय्या गंधे

 देशासह भाजपाच्या जडण-घडणीत स्व.अटलबिहारी यांचे योगदान प्रेरणादायी- भैय्या गंधे

स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारतीय राजकारणात एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या प्रदीर्घंं संसदीय कारकिर्दीत यांनी अनेक विषयांवर सरकाराला धारेवर धरत देशहिताच्या निर्णयात योगदान दिले. पंतप्रधान म्हणून केंद्रातील सरकार जनतेला आपले वाटवे, यासाठी सुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न करुन अनेक योजना राबवून देशाला सक्षम करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनाही आपलेसे करण्याची त्यांची खुबी हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू होते. जनसंघ ते भाजपाच्या उभारणीत आणि जडण-घडणीत त्यांचे योगदान प्रेरणादायी राहिले आहे. आदर्श संसदपटू, हळव्या मनाचा कवी ते प्रसंगी कठोर होवून शत्रूराष्ट्राला धडकी भरविणारे निर्णय घेणारे नेतृत्व अशा विविध गुणांनी संपन्न त्यांच्यात होते. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रोत्साहीत करत आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रा.मधुसूदन मुळे, वसंत लोढा, सुनिल रामदासी, अभय आगरकर, हेमंत कोहळे, बाबासाहेब वाकळे, वसंत राठोड, अ‍ॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, रविंद्र बारस्कर, प्रदीप परदेशी, अजय चितळे, लता शेळके, सुरेखा विद्ये, अंजली वल्लाकट्टी, कुसूम शेलार, अनिल सबलोक, सचिन पारखी, शिवाजी दहिंडे, किशोर बोरा, प्रशांत मुथा, बाळासाहेब गायकवाड, गणेश साठे, चंद्रकांत पाटोळे, किशोर कटोरे, सुमित बटूळे, ज्ञानेश्वर काळे, शशांक कुलकर्णी, लक्ष्मीकांत तिवारी,प्रताप परदेशी, राजू मंगलारम , भोसले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.मधुसूदन मुळे म्हणाले, माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी हे देशाचा अभिमान असलेले व्यक्तीमत्व. आपल्या अफाट बुद्धीसामर्थ्याने भारतीय राजकारण, समाजकारण, कवी अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळी छाप पाडली. देशहिताला प्राधान्य देत हिंदूस्थानची प्रतिमा जगात उंचविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. आदर्श व्यक्तीमत्व कसे असावे याचे ते मुर्तीमंत उदाहारण होते. त्यांचे मार्गदर्शक विचारांवर आज अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. याप्रसंगी वसंत लोढा, सुनिल रामदासी, अनिल सबलोक, हेमंत कोहळे, अ‍ॅड.अभय आगरकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अ‍ॅड.विवेक नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन तुषार पोटे यांनी केले. शेवटी आभार महेश नामदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment